ETV Bharat / entertainment

Priyanka Chopra : प्रियांका चोप्राच्या चाहत्यांनी तिच्या नम्रतेबद्दल केले कौतुक - प्रियांकाचे चाहत्यांनी केले कौतुक

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या लंडनमध्ये तिच्या आगामी चित्रपट 'हेड्स ऑफ स्टेट'चे शूटिंग करत आहे. आता तिच्या शूटिंगच्या ठिकाणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये प्रियांका तिच्या चाहत्यांना नम्रपणे अभिवादन करताना दिसत आहे.

Priyanka Chopra
प्रियांका चोप्रा
author img

By

Published : Jun 23, 2023, 3:44 PM IST

मुंबई : ग्लोबल आयकॉन स्टार प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सिटाडेल आणि रोमँटिक कॉमेडी 'लव्ह अगेन' या वेब सीरिज अलीकडे रिलीज झालेल्यानंतर, प्रियांका लवकरच प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते जॉन सीना आणि इद्रिस एल्बासोबत ‘हेड्स ऑफ स्टेट’नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. सध्याला या चित्रपटाची शुटिंग ही लंडनमध्ये सुरू आहे. अलीकडेच,सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये, प्रियांकाने शूटिंगदरम्यान तिच्या चाहत्यांसोबत बोलताना दिसली. प्रियांका हा व्हिडिओ सोशल मीडियावर फार व्हायरल झाला असून चाहत्यांनी तिच्या नम्रतेबद्दल कौतुक केले आहे. हा व्हिडिओ प्रियांका चोप्राच्या फॅन पेजवर पोस्ट करण्यात आला आहे.

प्रियांकाचे चाहत्यांनी केले कौतुक : व्हिडिओमध्ये, प्रियांका बाहेर जमलेल्या चाहत्यांसोबत संवाद करताना दिसत आहे. याशिवाय ती प्रत्येकाला 'हॅलो' म्हणताना आणि शेकहॅन्ड करताना दिसत आहे. याठिकाणी प्रियांकाच्या चित्रपटाचे शूटिंग होत आहे. कॅज्युअल पोशाखात, प्रियांका यावेळी अत्यंत सुंदर दिसत होती. प्रियांकाने यावेळी काळ्या जीन्ससह राखाडी टँक टॉपवर गडद हिरव्या रंगाचे जाकीट घालतले आहे. तिने तिच्या केसांची वेणीत बांधली आहे. व्हिडिओमध्ये, प्रियंका गाडी चालवत असताना आणि तिचे चाहते तिला 'बाय, प्रियांका' म्हणताना दिसत आहे.

प्रियांकाच्या व्हिडिओवर आल्या भरपूर कमेंट : हा व्हिडिओ शेअर होताच चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट देत म्हटले, 'ती खूप सुंदर आणि सुंदर आहे'. दुसर्‍याने चाहत्याने कमेंट देत म्हटले, 'फिट आणि हॉट' तर आणखी एका चाहत्याने म्हटले, 'ती सर्वोत्तम आहे'. इल्या नैशुलर दिग्दर्शित हेड्स ऑफ स्टेटमध्ये प्रियांका चोप्रा, जॉन सीना आणि इद्रिस एल्बा मुख्य भूमिकेत आहेत. सॅफ्रान कंपनीसाठी पीटर सफ्रान आणि जॉन रिकार्ड यांनी सह-निर्मिती केलेला हा चित्रपट एक अ‍ॅक्शन थ्रिलर असल्याचे मानले जाते. प्रियंका चोप्राने २०२३ मध्ये या प्रोजेक्टसाठी शुट करणे सुरू केले आहे. हॉलीवूड चित्रपटाव्यतिरिक्त, ती फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा' नावाच्या बॉलिवूड चित्रपटात देखील दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कतरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. Ram Charan upasana baby girl :'मेगा प्रिन्सेस'च्या भेटीसाठी अल्लू अर्जुन हॉस्पिटलमध्ये, नात भाग्यवान असल्याचे चिरंजीवींचे मत
  2. SRK daughter Suhana Khan : शाहरुखची पोरगी सुहाना खानने 'शेतकरी' म्हणून खरेदी केली अलिबागमध्ये जमीन
  3. Suhana Khan : सुहाना खान अलिबाग पर्यटनस्थळाच्या प्रेमात पडली...कोट्यवधी खर्चून घेतला 'हा' निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.