मुंबई - Salman and Abhishek hug video : चित्रपट निर्माते आनंद पंडित यांनी गुरुवारी रात्री मुंबईत एक भव्य बर्थडे सेलेब्रेशनचं आयोजन केलं होतं. या पार्टीत बॉलिवूड तारे-तारकांची मांदियाळी पाहायला मिळाली. हजेरी लावलेल्या सेलिब्रिटींमध्ये अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, अभिषेक बच्चन, कार्तिक आर्यन, जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉफ, हृतिक रोशन आणि नील नितीन मुकेश यांचा समावेश होता.
सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात शेअर केलेल्या पडद्यामागच्या व्हिडिओमध्ये सलमान खान 'बिग बी' आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना स्टेजवर मिठी मारताना दिसला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी दोघांना एकत्र पाहून आश्चर्य व्यक्त केलं.
व्हिडिओवर व्हायरल झाल्यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सनी सलमानचे ऐश्वर्यासोबतचे पूर्वीचे नाते खोदून काढले आणि कमेंट सेक्शनमध्ये त्यांची खिल्ली उडवली. व्हिडिओवर प्रतिक्रिया देत एका सोशल मीडिया युजरने लिहिले: "ऐश्वर्या आ जाती तो और अच्छा होता सलमान भाई." दुसर्याने कमेंट केली: "भाई पूछ रहा ऐश्वर्या कैसी है?"
असx असले तरी, काही युजर्सनी व्हिडिओवर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. व्हायरल व्हिडिओला प्रतिसाद देताना, एका युजरने कमेंट केली: "सर्व व्यापक विचारसरणीचे लोक त्यांचे वैयक्तिक जीवन आणि व्यावसायिक जीवन वेगळे ठेवतात. ते भिन्न दृष्टिकोन असलेल्या लोकांना भेटतात आणि खोटे लोक हे समजू शकत नाहीत." ट्रोलर्सना खडे बोल सुनावताना एका युजरने लिहिले की , "सलमानला मिठी मारताना अभिषेक बच्चनचं मन किती मोठं आहे हे दिसून येतं. इतर पुरुषांनी त्यांच्याकडून शिकले पाहिजे."
चित्रपट निर्माते आनंद पंडित यांच्याबद्दल सांगायचे तर, निर्माता म्हणून त्यांच्या नाववर अनेक लोकप्रिय चित्रपट आहेत. त्यांनी 'चेहरे', 'द बिग बुल', 'थँक गॉड' आणि 'टोटल धमाल' सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. दरम्यान, सलमानने अलीकडेच अॅक्शन थ्रिलर 'टायगर 3' चित्रपटामध्ये अभिनय केला. मनीष शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकांमध्ये होते. सलमानने त्याच्या आगामी चित्रपटाची माहिती अद्याप उघड केलेली नाही.
अमिताभबद्दल बोलायचं तर, तो पुढे दीपिका पदुकोण आणि प्रभाससोबत सायन्स फिक्शन अॅक्शन थ्रिलर 'कल्की 2898 एडी'मध्ये दिसणार आहे. तर अभिषेकने अलीकडेच 'घूमर' या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात केलेल्या कामाचं कौतुक झालं होतं.
Also read: