ETV Bharat / entertainment

Katrina Kaif airport Look : मुंबई विमानतळावर चाहत्यांनी कॅटरिना कैफला घेरले.... - कॅटरिना कैफ चाहत्यांमध्ये अडकली

कॅटरिना कैफ मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी तिला तिच्या चाहत्यांनी सेल्फी घेण्यासाठी घेरले होते. त्यानंतर तिने स्वत;ची तिथून सुटका केली आणि ती स्वत;च्या कारमध्ये जाऊन बसली.

Katrina Kaif
कॅटरिना कैफ
author img

By

Published : Jul 7, 2023, 12:33 PM IST

मुंबई : बॉलिवूडची बार्बी डॉल कॅटरिना कैफ सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. लग्नानंतर ती 'फोन भूत' या चित्रपटात दिसली होती. तसेच सध्याला कॅटरिनाचे चाहते तिच्या आगामी चित्रपट टायगर ३ ची वाट पाहत आहेत. या चित्रपटात पुन्हा एकदा आपल्याला रूपेरी पडद्यावर कॅटरिना कैफ आणि सलमान खानची दमदार जोडी दिसणार आहे. 'टायगर जिंदा है' टाईगर २ या चित्रपटांनी फार जास्त बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती. आता पुन्हा एकदा ही हिट जोडी त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी येत आहे. दरम्यान नुकतीच कॅटरिना ही मुंबई विमानतळावर दिसली. मुंबई विमानतळावरून ती बाहेर पडताना तिला तिच्या चाहत्यांनी घेरले. यावेळी ती कूल लूकमध्ये दिसली. या लूकमध्ये ती फार देखणी दिसत होती.

कॅटरिना कैफ चाहत्यांमध्ये अडकली : कॅटरिना कैफ विमानतळाच्या चेक-इनमधून बाहेर येताच तिला चाहत्यांनी घेरले आणि तिच्यासोबत सेल्फी घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर कॅटरिनाने कशीतरी चाहत्यांपासून सुटका करून घेतली आणि तिच्या कारमध्ये जाऊन बसली.

कॅटरिना कैफ एअरपोर्ट लूक : कॅटरिना कैफ तिची अमेरिका ट्रिप संपवून मायदेशी परतली आहे. विमानतळावरील लूकमध्ये ती फार सुंदर दिसत होती. कॅटरिनाने यावेळी निळ्या डेनिम ट्राउझर्सवर पांढरा शिफॉन ब्लाउज टाईप शर्ट घातला होता. चेहऱ्यावर तिने कमीतकमी मेकअप केले होते. शिवाय तिने मोकळे केस सोडले होते. तसेच तिने मोठ्या आकाराचा सनग्लास आणि पांढरे स्नीकर्स देखील घातले होते. या लूकमुळे सर्वांच्या नजरा या तिच्याकडे वळत होत्या.

कॅटरिना कैफचा वर्कफ्रंट : दिग्दर्शक मनीष शर्माचा चित्रपट टायगर 3 व्यतिरिक्त, कॅटरिना कैफ झोया अख्तरच्या 'जी ले जरा' या चित्रपटात देखील दिसणार आहे. नुकतीच बातमी आली होती की, कतरिना कैफ, आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रा यांनी 'जी ले जरा' या चित्रपटातून नकार दिला आहे. दरम्यान कॅटरिनाने नाही तर आलिया आणि प्रियांका यांनी चित्रपट सोडल्याची बातमी समोर येत आहे.

हेही वाचा :

  1. Divya khosla kumars Mother Passed Away : दिव्या खोसला कुमारच्या आईचे निधन, फोटोसह शेअर केली दु:खद बातमी
  2. Angira Dhar IMDb Breakout Star : अंगिरा धरला बनली वर्षातील दुसरी ब्रेकआउट स्टार, आयएमडीबीची घोषणा
  3. Sushmita Sen : सुष्मिता सेनने आपल्या मुलीसोबत आयफेल टॉवरसमोर केला डान्स...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.