ETV Bharat / entertainment

लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केल्यानंतर कॅटरिना कैफ मुंबई विमातळावर झाली स्पॉट - कतरिना कैफ आणि विकी कौशल

katrina kaif : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशलनं 9 डिसेंबर रोजी लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. आता यानंतर कॅट ही मुंबई विमानतळावर दिसली आहे.

katrina kaif
कॅटरिना कैफ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 11, 2023, 5:44 PM IST

मुंबई - katrina kaif : अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी 9 डिसेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. या जोडप्याचं लग्न राजस्थानमधील सवाई माधेपूर येथे झाले होते. दरम्यान या कपलनं यावर्षी त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला.आपल्या पती आणि कुटुंबासोबत क्वालिटी टाईम घालवल्यानंतर, कतरिना मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. विमानतळावर कॅट ही स्टायलिश अंदाजात दिसली. आता तिचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती खूप खास दिसत आहे. व्हिडिओमध्ये कॅट ही कारमधून उतरताना दिसत आहे.

कतरिना कैफचा व्हिडिओ : व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्टायलिश ब्लॅक जॉगर्स आणि मॅचिंग टी-शर्टमध्ये कॅट सुंदर दिसत आहे. यावर तिनं काळ्या आणि पांढर्‍या रंगाचा शूज आणि बेज ट्रेंच कोटसह सनग्लास घातला आहे. व्हिडिओत कॅट नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे. याशिवाय तिनं यावर सुंदर पोनीटेल घातली आहे. तिचा व्हायरल झालेला हा व्हिडिओ अनेकांना आवडत आहे. या व्हिडिओवर कमेंट करत एकानं लिहिलं, ''कतरिना मॅम मी तुमचा खूप मोठा चाहता आहे, तुम्ही नेहमीच सुंदर दिसता''. या पोस्टवर दुसऱ्या एकानं लिहिलं, ''कॅटचा एअरपोर्ट लूक खूप खास आहे''. यानंतर आणखी एकानं लिहिलं, ''कतरिना जगातून सर्वात सुंदर अभिनेत्री आहे''. अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत. याशिवाय काहीजण या व्हिडिओवर फायर आणि हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत.

विकी कौशलनं शेअर केला व्हिडिओ : लग्नाचा दुसरा वाढदिवसानिमित्त अभिनेता विकी कौशलनं त्याची पत्नी कतरिनाचा एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यानं यावर लिहिलं, ''फ्लाइटमध्ये आणि लाइफमध्ये मनोरंजन! लव्ह यू''. कतरिना सध्या काही प्रोजेक्टमध्ये व्यग्र आहे. 'टायगर 3'च्या प्रचंड यशानंतर ती विजय सेतुपतीसोबत 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटात दिसणार आहे. सध्या या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. याशिवाय विकी 'सॅम बहादूर'च्या यशाचा आनंद घेत असतानाच तो शाहरुख खानसोबत कॉमेडी-ड्रामा चित्रपट 'डंकी' रिलीज होण्याची वाट पाहत आहे. या चित्रपटानंतर तो 'मेरे मेहबूब मेरे सनम'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. ITA पुरस्कार सोहळ्यात तेजस्वी प्रकाश आणि हर्षद चोप्राने मारली बाजी
  2. रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' चित्रपटाची जगभरात झाली 700 कोटींची कमाई
  3. प्रभासच्या 'सालार भाग 1 : सीझफायर'ला सेन्सॉर बोर्डाकडून मिळालं 'ए' प्रमाणपत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.