ETV Bharat / entertainment

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी जॅकी श्रॉफने साफ केले मुंबईतील सर्वात जुने राम मंदिर - जुने राम मंदिर केले साफ

Jackie Shroff cleans Ram temple : ज्येष्ठ अभिनेता जॅकी श्रॉफ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत स्वच्छता मोहिमेत सहभागी झाला होता. मुंबईतील सर्वात जुने राम मंदिर साफ करताना त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Jackie Shroff cleans Ram temple
राम मंदिर साफ करताना जॅकी श्रॉफ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 19, 2024, 3:51 PM IST

मुंबई - Jackie Shroff cleans Ram temple : आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अनुभवी बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफलाही पर्यावरणाविषयी प्रचंड आवड आहे. जमिनीचं सवर्धन करणे आणि झाडे लावण्याच्या मोहीमेत तो अग्रभागी असतो. अलीकडेच जॅकीने स्वच्छतेच्या उपक्रमात भाग घेतल्यानंतर लक्ष वेधून घेतले.

इंस्टाग्रामवर पापाराझीच्या उकाउंटवर शेअर केलेला व्हिडिओ मुंबईतील सर्वात जुन्या राम मंदिरातील पायऱ्यांच्या साफसफाईमध्ये जॅकी श्रॉफ सहभागी झाल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाला आणि त्याच्या अस्सल आणि नम्र कृतीने प्रभावित झालेल्या नेटिझन्सकडून भरपूर प्रशंसा मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार 22 जानेवारी रोजी अयोध्या राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याशी या स्वच्छता मोहिमेचा संबंध आहे. भारतभरातील मंदिरे स्वच्छ करण्यात अनेक मंत्री आणि सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. जॅकी श्रॉफ यांच्यासोबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या साफसफाईला हजेरी लावली होती.

कामाच्या आघाडीवर, जॅकी श्रॉफ अखेरचा अभिनेत्री नीना गुप्तासोबत 'मस्त में रहने का' चित्रपटामध्ये दिसला. डिसेंबर २०२३ मध्ये अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर या चित्रपटाचा प्रीमियर झाला. या चित्रपटात त्याने कामत या , एका निवृत्त विधुराची भूमिका केली होती. नवीन नाते संबंध निर्माण करण्याच्या दृढ निश्चयाने, कामत मोठे साहस करतो आणि त्याची श्रीमती हांडा यांच्याशी मैत्री होते.

जॅकी श्रॉफ आगामी अहमद खान दिग्दर्शित 'बाप' या चित्रपटात चमकणार आहे. या चित्रपटातून 90 च्या दशकातील प्रतिष्ठित अॅक्शन हिरो, मिथुन चक्रवर्ती, सनी देओल आणि संजय दत्त यांचे पुन्हा एकत्र येणे अपेक्षित आहे.

हेही वाचा -

  1. "पंतप्रधानांनी 'हृदय में श्रीराम' गीत शेअर करणं हा प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद": सुरेश वाडकर यांची ईटीव्ही भारतशी एक्स्लुझिव्ह प्रतिक्रिया
  2. 'शैतान' येत आहे: अजय देवगणचा ज्योतिका आणि माधवनच्या चित्रपटाचे शीर्षक ठरले
  3. विकी जैनला वाटते टॉप 5 मध्ये असेल मन्नारा चोप्रा, अंकिता लोखंडे नाराज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.