ETV Bharat / entertainment

Deepika Padukone and Ranveer Singh : करण जोहरच्या पार्टीत सामील झाले 'हे' कलाकार.... - रॉकी और रानी की प्रेम कहानी यश साजरे केले

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाचे यश साजरे करण्यासाठी करण जोहरने एक पार्टी त्याच्या घरी आयोजित केली होती. या पार्टीत दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि आलिया भट्टसह अनेक कलाकार आले होते.

Deepika Padukone and Ranveer Singh
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण
author img

By

Published : Jul 29, 2023, 1:18 PM IST

मुंबई : बॉलिवूडचे स्टार कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण काल ​​रात्री चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या घरी दिसले. रणवीर आणि दीपिका 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चे यश साजरे करण्यासाठी करणच्या घरी आले होते. दीपिका पदुकोण 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या स्क्रिनिंगला उपस्थित नव्हती. ती अमेरिकेतून शुक्रवारीच परतली आहे. करणच्या या पार्टीत दीपिका आणि रणवीर वेगवेगळे आले होते मात्र जात दोघे एकत्र गेले होते.

दीपिका आणि रणवीर झाले पार्टीत सामील : 'पार्टीमॅन' अशी ओळख असलेल्या निर्माता-दिग्दर्शक करण जोहरला आपल्या मित्र-मैत्रिणींना पार्टीसाठी बोलावण्याचे भन्नाट निमित्त मिळाले. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चे सक्सेस! शुक्रवारी करणच्या घरी त्याचे यार-दोस्त पार्टी मूडमध्येच पोहोचले. दीपिका पदुकोण या पार्टीपूर्वी नुकतीच अमेरिकेहून परतली होती. दीपिका क्लिपमध्ये तिच्या कारमध्ये करणच्या घरी येताना दिसत आहे. तिने प्रिंटेड ग्रीन टॉप आणि डेनिम्स परिधान केला आहे. दीपिका एकटीच या पार्टीत पोहचली होती. त्यानंतर रणवीर त्याच्या कारमधून करणच्या घरी पोहोचला होता. यावेळी रणवीरने पांढरी टी-शर्ट, पँट आणि टोपी परिधान केली होती. याशिवाय त्याने फेस मास्क देखील लावला होता. रणवीरने त्याच्या स्टाइलने पापाराझींकडे पाहत फ्लाइंग किस करत डोळे मिचकावले. पार्टी संपल्यानंतर दीपिका आणि रणवीर एकत्र घरी जात असताना कारमध्ये हे कपल रोमँटिक अंदाजात दिसले. अमेरिकेतून परतल्यानंतर 'हब्बी' रणवीरच्या सान्निध्याच असल्याचा आनंद दीपिकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

आलिया भट्ट उशीरा आली पार्टीत : आलिया भट्ट या पार्टीत थोडी उशीरा सामील झाली होती. या पार्टीत आलियाही खूप सुंदर दिसत होती. करणच्या या पार्टीत दिग्दर्शक झोया अख्तर , अयान मुखर्जी आणि डिझायनर मनीष मल्होत्रासह अनेक बॉलिवूड कलाकार आले होते. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी ११.५०ची कमाई केली. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी हे कलाकार प्रमुख भूमिकेत असून या चित्रपटामध्ये त्यांनी चांगला अभिनय केला आहे असे अनेक चाहते सोशल मीडियावर पोस्टद्वारे सांगत आहेत.

दीपिकाचे आगामी चित्रपट : दीपिका एरियल अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट 'फायटर'मध्ये हृतिक रोशनसोबत दिसणार आहे. याशिवाय ती 'कल्की २८९८ एडी'मध्ये देखील प्रभाससोबत दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका आणि प्रभास व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दिशा पटानी हे देखील कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नाग अश्विन दिग्दर्शित हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

हेही वाचा :

  1. Hemant Dhome : 'रॉकी और रानी...'मध्ये क्षिती जोगला पाहून हेमंत ढोमेला झाले आकाश ठेंगणे!!
  2. RARKPK box office collection day 1 :'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाने पहिल्या दिवशी केली धमाकेदार कमाई...
  3. Guns and Gulaabs trailer : 'गन्स अँड गुलाब' ची पहिली झलक, दुल्कर सलमानने केली ट्रेलर रिलीजची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.