मुंबई : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन त्याच्या आगामी 'पुष्पा २' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची खूप क्रेझ प्रेक्षकांमध्ये बघायला मिळत आहे. गेल्या एप्रिलमध्ये अल्लु अर्जुनच्या वाढदिवसादरम्यान 'पुष्पा २' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला होता. हा टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित होताच याला प्रेक्षकांनी खूप पसंत केले. तेव्हापासून अल्लू अर्जुनचे चाहते त्याच्या 'पुष्पा २' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुन हा वेगळ्याच लूकमध्ये दिसला होता. यापूर्वी त्याचा इतका अतरंगी लूक कुठल्याच चित्रपटात दिसला नव्हता.
'पुष्पा २'च्या डायलॉगबद्दल चर्चा : 'पुष्पा २' चित्रपट कधी प्रदर्शित होईल याबद्दल कुठलीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटाचा एक डायलॉग लीक झाला आहे. अल्लू अर्जुनने स्वत: एका इव्हेंटमध्ये त्याच्याच शब्दांतून 'पुष्पा २'चा एक संवाद लीक केला. आता सोशल मीडियावर या डायलॉगबद्दल चर्चा होत आहे. लीक झालेल्या डायलॉगमुळे या चित्रपटाबद्दलची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढली आहे.
-
Icon StAAr #AlluArjun LEAKS #Pushpa 2 dialogue on the stage.
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) July 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
| #Pushpa2 | #PushpaTheRule | pic.twitter.com/QXbEaSnR7S
">Icon StAAr #AlluArjun LEAKS #Pushpa 2 dialogue on the stage.
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) July 20, 2023
| #Pushpa2 | #PushpaTheRule | pic.twitter.com/QXbEaSnR7SIcon StAAr #AlluArjun LEAKS #Pushpa 2 dialogue on the stage.
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) July 20, 2023
| #Pushpa2 | #PushpaTheRule | pic.twitter.com/QXbEaSnR7S
डायलॉगचा मराठी अर्थ काय आहे? : अल्लू अर्जुन हा हैदराबादमध्ये 'बेबी' चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत गेला होता. यावेळी त्याला 'पुष्पा २' बद्दल काही तरी बोल असा आग्रह धरण्यात आला. यावेळी तो म्हणाला, 'मी इथं 'पुष्पा '२ बद्दल बोलण्यासाठी आलेलो नाही. परंतु, यातील एक ओळ म्हणण्यासाठी मी स्वतःला थांबवू शकत नाही.' नंतर तो तेलुगु भाषेत म्हणाला, 'इदिवुंदेडी ओकट रुल अडी पुष्पा गाडी रुल.' त्याचा हा डायलॉग ऐकल्यानंतर समोर बसलेल्या प्रेक्षकांतून एकच जोरदार गर्जना ऐकायला मिळाली. या संवादाचा मराठीत अर्थ असा आहे, 'इथं फक्त एकाचेच राज्य चालते, ते म्हणजे पुष्पाचे राज्य.'
'बेबी' हा चित्रपट तेलुगु भाषेत रिलीज झाला असून यामध्ये विजय देवराकोंडाचा भाऊ आनंद देवराकोंडा मुख्य भूमिकेत आहे. विजय आणि पुष्पाची श्रीवल्ली रश्मिका मंदाना यांची मैत्री सर्वश्रृत आहे. 'बेबी' हा चित्रपट सुपरहिट झाला असून अलिकडेच याच्या प्रीमियरला विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदान्नाने हजेरी लावली होती. बेबीच्या सक्सेस पार्टीत 'पुष्पा' स्टार अल्लु अर्जुन स्टार पाहुणा म्हणून दाखल झाला होता.
हेही वाचा :
Alia Bhatt : भविष्यात राहा कपूर काय बनणार? आलिया भट्टने दिले भन्नाट उत्तर...
anupam kher : अनुपम खेर आणि जया बच्चन यांनी मणिपूर हिंसाचारवर व्यक्त केला आपला संताप...
Ranveer Singh : मनीष मल्होत्राच्या फॅशन शोमध्ये रणवीर सिंगने पत्नी दीपिका पदुकोणचे घेतले चुंबन