ETV Bharat / entertainment

Artist om swami : चित्रकार-शिल्पकार ओम स्वामी यांनी दृष्टी गमावलेल्या मुलींसाठी राबवला सामाजिक उपक्रम - विवेक ओबेरॉय केलं उद्घाटन

Artist om swami : चित्रकार-शिल्पकार ओम स्वामी हे दृष्टी गमावलेल्या मुलींसाठी एक उपक्रम राबवत आहेत. ते या मुलींना तो चित्रकला आणि शिल्पकला शिकवणार आहेत. अभिनेता विवेक ओबेरॉय आणि सचिन खेडेकर आदींच्या उपस्थितीत नुकतंच या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं.

Artist om swami
चित्रकार शिल्पकार ओम स्वामी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2023, 3:05 PM IST

Updated : Nov 6, 2023, 2:49 PM IST

मुंबई - Painter om swami : चित्रकार-शिल्पकार ओम स्वामी एका 'आराध्या - दि डेइटी' या उपक्रमाद्वारे दृष्टीहिन मुलींना मूर्ती घडवण्यासोबतच चित्रकलेचेही धडे देणार आहेत. चित्रकला आणि शिल्पकलेद्वारे या मुलींसाठी भविष्यात रोजगार निर्माण होऊ शकेल. मुंबईतील ओम स्वामी यांचे आराध्या दि डेइटी ' हे अनोखे प्रदर्शन खूप प्रेरणादायक ठरलं. वरळीतील वाची आर्ट गॅलरीमधील कलेचा मोहून टाकणारा हा देखावा अनेकांसाठी प्रेरक ठरला. या कार्यक्रमाला अभिनेता विवेक ओबेरॉय, सचिन खेडेकर, राजीव शर्मा, अभिनेत्री रीना कपूर आवर्जून उपस्थित राहिले. वाची आर्ट गॅलरीचे मालक सुनीता संघाई, अजॉयकांत रुईया, विवेक ओबेरॉय आणि इतर कलाकारांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

विवेक ओबेरॉयने केलं उद्घाटन : या कार्यक्रमामध्ये विवेक ओबेरॉयनं म्हटलं आपण ओम स्वामींच्या रचनांचे चाहते असल्याचं सांगून टाकलं. ओम स्वामी यांनी घडवलेली पेंटिंग आणि शिल्प आपल्या घरात असल्याचा आवर्जून उल्लेख करत विवेकनं दृष्टी गमावलेल्या मुलींसाठी ओम स्वामी यांनी सुरु केलेल्या उपक्रमांचं तोंड भरुन कौतुक केलं. विवेक पुढे म्हणाला की, ''वाची हे सरस्वती आणि लक्ष्मीचे सुंदर मिश्रण आहे आणि या दोन देवी आपल्या संस्कृतीचे उत्कृष्ट प्रतिनिधित्व आहेत. एकीकडे, लक्ष्मी समृद्धी, विपुलता आणि कल्याणाचं प्रतीक आहे, तर दुसरीकडे, माँ सरस्वती कलेचे प्रतिनिधित्व करते. जेव्हा दोन्ही एकत्रपणे येतात, तेव्हा तुम्ही खरोखरच वाची आर्ट गॅलरीसारखे काहीतरी सुंदर बनवता.''

ओम स्वामीच्या पेंटिंग : सचिन खेडेकर यांनी सांगितलं, ''मला ओम स्वामींबद्दल खूप अभिमान आहे आणि आज इथे आम्हाला खूप आनंद होत आहे. माझ्या घरी ओमची पेंटिंग पाच वर्षांपासून आहे आणि ते माझ्यासाठी लकी चार्म आहे. ओम आणि त्याच्या शैलीबद्दल मला जे आवडतं ते म्हणजे त्यांच्या पेंटिंग्जमध्ये अनोखं वेगळेपण आहे.'' ओम स्वामींची सर्व पेंटिंग गणपतीबाप्पा या संकल्पनेवर आधारित आहेत, हे विशेष. हे प्रदर्शन वरळीच्या एट्रिया मॉलमधील वाची आर्ट गॅलरी येथे 4 नोव्हेंबर रोजी सुरू होऊन 13 नोव्हेंबरपर्यंत चालेल. त्यानंतर 14 ते 20 नोव्हेंबर 2023 या कालावधीत जहांगीर आर्ट गॅलरीतसुद्धा हे प्रदर्शन भरणार आहे.

हेही वाचा :

  1. Marathi Rangbhumi Din : प्रेक्षकांमधून लोकप्रिय ठरलेल्या 'या' अभिनेत्यांनी नाटकांमधून करियरला केली सुरुवात; जाणून घ्या
  2. Kangana Ranaut : चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर कंगणा राजकारणाच्या मैदानात? 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे दिले संकेत
  3. Shahrukh Khan Birthday : शाहरुख खाननं वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी सेलिब्रेटींचे मानले मनापासून आभार...

Last Updated : Nov 6, 2023, 2:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.