ETV Bharat / entertainment

विवेक अग्निहोत्रीचा Y श्रेणीच्या सुरक्षेमध्ये मॉर्निंग वॉक, काहींना झोंबल्या मिर्च्या - morning walk amid Y category security

वादग्रस्त चित्रपट द काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दिग्दर्शक सरकारद्वारे प्रदान केलेल्या हाय-प्रोफाइल Y सुरक्षेने वेढलेला मॉर्निंग वॉक करताना दिसत आहे. यामुळे तो लोकांच्या निशाण्यावर आला आहे.

विवेक अग्निहोत्रीचा Y श्रेणीच्या सुरक्षेमध्ये मॉर्निंग वॉक

author img

By

Published : Dec 23, 2022, 12:53 PM IST

मुंबई - 2022 मधील चर्चेतील चित्रपट 'द काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी शुक्रवारी (23 डिसेंबर) सकाळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ मॉर्निंग वॉकचा आहे, ज्यामध्ये दिग्दर्शक भारत सरकारने दिलेल्या Y श्रेणीच्या सुरक्षेत फिरताना दिसत आहे. वादग्रस्त चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता या व्हिडिओवर यूजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. यासोबतच दिग्दर्शकाने हा व्हिडिओ शेअर करून वैयक्तिक स्वातंत्र्यावरही अनेक गोष्टी लिहिल्या आहेत.

दिग्दर्शक म्हणाला - किंमत मोजावी लागेल - विवेकने त्याच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत चित्रपट दिग्दर्शकाने लिहिले आहे की, 'काश्मीरमधील हिंदूंचा नरसंहार, हिंदू बहुसंख्य देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, हाहाहा...'माझ्याच देशात कैद' आणि 'फतवा' दाखवण्यासाठी किंमत मोजावी लागेल. . या व्हिडीओमध्ये विवेक काळ्या रंगाच्या ट्रॅकसूटमध्ये दिसत असून Y श्रेणीचे सुरक्षा कर्मचारी त्याच्याभोवती फिरत आहेत.

आता यूजर्स अशा कमेंट करत आहेत - विवेकने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताच. यावर लोकांच्या प्रतिक्रियांचा पूर आला होता. यासाठी काही यूजर्स त्याला ट्रोल करत आहेत तर काहीजण चित्रपट दिग्दर्शकाच्या बाजूने बोलत आहेत. विवेकच्या या व्हिडिओवर एका यूजरने टोमणे मारत लिहिले आहे, 'अरे..माय टॅक्स मनी.' आणखी एका युजरने 'करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी' असे विरोधी स्वरात लिहिले आहे. त्याचवेळी आणखी एक युजर लिहितो की, 'तुम्ही आमच्या टॅक्सच्या पैशातून सिक्युरिटी घेत आहात, तुमची फिल्म टॅक्स फ्री करून'. त्याच वेळी, काही युजर्सनी दिग्दर्शकाचे समर्थन केले आहे आणि हे त्याच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे.

दिग्दर्शकाला वाय श्रेणीची सुरक्षा का मिळाली? - विवेकचा चित्रपट द काश्मीर फाइल्स या वर्षी मार्चमध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात काश्मीरमध्ये 1990 साली झालेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती, मात्र देशात आणि जगात अनेक ठिकाणी हा चित्रपट केवळ प्रचारकी असल्याचे बोलले जात होते. या चित्रपटाचा देशभरात मोठा विरोध झाला होता.

या चित्रपटाबाबत भारतीय राजकारणातील नेत्यांनीही एकमेकांवर निशाणा साधला. देशातील बिघडलेली परिस्थिती पाहून चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि चित्रपटाचे मुख्य अभिनेते अनुपम खेर यांनाही सरकारने हायप्रोफाईल सुरक्षा दिली आहे.

हेही वाचा - ऑस्करसाठी भारत आणि पाकिस्तानचे चित्रपट आमने सामने, 'चेल्लो शो' आणि 'जॉयलँड'ची एकाच श्रेणीत निवड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.