मुंबई - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला एकदिवसीय सामना मुंबईतील वानखेडे मैदानात खेळला गेला. यावेळी मैदानावर ऑस्कर पुरस्कार विजेते नाटू नाटू हे गाणे वाजले. त्यावेळी मैदानात भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत होता. नाटू नाटू गाणे वाजायला लागल्यानंतर क्षेत्ररक्षण करत असलेल्या विराट कोहलीच्या अंगात या गाण्याचे बोल भिनले आणि या गाण्याच्या हुक स्टेपवर त्याने ताल धरला. त्याचा हा व्हिडिओ आरआरआर टीमने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या गाण्यावर थिरकलेल्या विराट कोहलीची सोशल मीडियात भरपूर चर्चा आहे.
नाटू नाटूवर विराट कोहलीने धरला ताल - सोशल मीडियावर फिरत असलेला विराट कोहलीचा हा नाटू नाटूवरील छोटा व्हिडिओ पाहून आरआरआरच्या चाहत्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. अनेकजण विराटची तुलना ज्युनियर एनटीआरशी करत आहेत. तर अनेकांनी हा व्हिडिओ एडिट करुन क्लिप स्लो मुव्ह करत लूपही केली आहे. आरआरआरच्या इन्स्टाग्रामवर या व्हिडिओला हजोरो लोक लाईक व कमेंट करत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
क्रिकेटमध्ये हरभजन सिंग आणि सुरेश रैनाही नाटू नाटूवर थिरकले - यापूर्वी नाटू नाटू गाण्यावर लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांनीही डान्स केला होता. नाटू नाटूवर हे दोघेजण रामचरण आणि ज्युनियर एनटीआरच्या स्टाईलमध्ये मैदानावर जोरदार थिरकताना दिसले होते. क्रिकेटर्ससह सर्वच सेलेब्रिटींना हे गाणे ताल धरायला लावते याचे अनेक व्हिडिओ यापूर्वी व्हायरल झाले आहेत. कसोटी सामन्याच्या दरम्यान जेव्हा ऑस्कर पुरस्काराची गोषणा झाली तेव्हा सुनिल गावस्कर यांनीही कॉमेंट्री करताना नाटू नाटूवर डान्स केला होता. रविंद्र जडेजा आणि आर अश्वीनही एका व््हिडिओ डान्स करताना दिसले होते.
-
'Naatu Naatu' from Suresh Raina and Harbhajan Singh. pic.twitter.com/s6kN0bdVIx
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">'Naatu Naatu' from Suresh Raina and Harbhajan Singh. pic.twitter.com/s6kN0bdVIx
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 15, 2023'Naatu Naatu' from Suresh Raina and Harbhajan Singh. pic.twitter.com/s6kN0bdVIx
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 15, 2023
ऑस्कर पुरस्कार विजेते नाटू नाटू - ९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात नाटू नाटू गाण्याने मूळ गाण्याच्या श्रेणीमध्ये ऑस्कर जिंकले. हा क्षण प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा होता. चंद्र बोस या तेलुगु गीतकारांने लिहिलेल्या गाण्याला संगीतकार एमएम कीरवानी यांनी संगीतबद्ध केले होते आणि गायक राहुल सिपलीगुंज आणि काळ भैरव यांनी त्याला स्वरसाज चढवला होता. आरआरआर या चित्रपटात स्वातंत्र्यासाठी लढा देणारे दोन तरुण जेव्हा ब्रिटीशांचाया पार्टीत जातात तेव्हा हा धमाकेदार परफॉर्मन्स देतात असा सीन होता. तेलुगु सुपरस्टार राम चरण आणि ज्यनियर एनटीआर यांनी नाटू नाटूवर कडक परफॉर्मन्स केला होता. आरआरआर चित्रपटातील हे गाणे जगभरातील लोकांच्या पसंतीस उतरले आणि गोल्डन ग्लोब ते ऑस्करपर्यंतच्या प्रवासात ते विजेते गाणे ठरले. हा पुरस्कार मिळाल्यानंतर जगभरातील लोक या गाण्यावर डान्स रील बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.