ETV Bharat / entertainment

विक्रम वेधाचे जबरदस्त शीर्षक गीत बंदे रिलीज

विक्रम वेधा चित्रपटामधील बंदे या शीर्षक गीतामध्ये वेधाचा (हृतिकने साकारलेला) गँगस्टर बनण्याचा प्रवास आणि विक्रम (सैफ अली खानने साकारलेली भूमिका ) वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन दर्शविणारी एक थीम पाहायला मिळत आहे.

author img

By

Published : Sep 26, 2022, 1:17 PM IST

विक्रम वेधाचे जबरदस्त शीर्षक गीत रिलीज
विक्रम वेधाचे जबरदस्त शीर्षक गीत रिलीज

मुंबई - आगामी अॅक्शन थ्रिलर चित्रपट विक्रम वेधाच्या ( Vikram Vedha ) निर्मात्यांनी सोमवारी बंदे या शीर्षक गीताचे ( title track Bande ) लॉन्चिंग केले. इंस्टाग्रामवर टी सिरीजने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्याला त्यांनी कॅप्शन दिले आहे, "विक्रम वेधाची इलेक्ट्रीफाईंग थीम आली आहे! #बंदे गाणे आता आऊट झाले आहे. #विक्रमवेधा 30 सप्टेंबर 2022 रोजी जगभरातील सिनेमागृहात येत आहे."

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

शिवमने गायलेले आणि मनोज मुनताशीर यांनी लिहिलेले, विक्रम वेधाच्या शीर्षकगीतामध्ये वेधाचा (हृतिकने साकारलेला) गँगस्टर बनण्याचा प्रवास आणि विक्रमचे (सैफने साकारलेले) वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन दाखवण्यात आले आहे. पुष्कर आणि गायत्री दिग्दर्शित, या चित्रपटात रोहित सराफ आणि राधिका आपटे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत आणि 30 सप्टेंबर 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

विक्रम वेधा हा समान शीर्षक असलेल्या तमिळ चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे, ज्यात आर माधवन आणि विजय सेतुपती यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या. विक्रम वेधाची कथा ट्विस्ट आणि टर्नने भरलेली आहे, कारण एक कठोर पोलीस विक्रम (सैफ अली खान) एक भयानक गुंड वेधा (हृतिक रोशन) चा माग काढण्यासाठी आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी निघतो.

दरम्यान, विक्रम वेधा व्यतिरिक्त, हृतिक दीपिका पदुकोणसोबत सिद्धार्थ आनंदच्या आगामी अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'फायटर'मध्ये देखील दिसणार आहे. दुसरीकडे, सैफ आता आगामी पॅन इंडिया चित्रपट आदिपुरुषमध्ये दक्षिण अभिनेता प्रभास आणि क्रिती सेननसोबत दिसणार आहे.

हेही वाचा - First Glimpse Of Ram Setu : बहुप्रतीक्षित रामसेतु चित्रपटाची पहिली झलक, धमाकेदार टिझर रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.