मुंबई हृतिक रोशन आणि सैफ अली खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. विक्रम वेधा चित्रपटाचा टीझर बुधवारी (24 ऑगस्ट) रिलीज झाला आहे. दोन्ही स्टार्स दमदार अॅक्शन करताना दिसत आहेत. या चित्रपटात हृतिक रोशन 'वेधा'ची भूमिका साकारत आहे तर सैफ अली खानने इन्स्पेक्टर विक्रमची भूमिका साकारली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
या टीझरमध्ये हृतिक रोशन वेधाच्या भूमिकेत अतिशय आक्रमक दिसत असून भरपूर अॅक्शन करताना तो दिसणार आहे. या भूमिकेत तो चपखल दिसत असून या साहसी भूमिकेसाठी त्याने भरपूर तयारी केली आहे. या चित्रपटासाठी अत्यंत अवघड असे स्टंट त्याने स्वतः केले आहेत. या चित्रपटासाठी पार्श्वसंगीतही अतिशय समर्पक असे वाटत आहे. विक्रमच्या भूमिकेतील सैफ अली खान अत्यंत थंड डोक्याने विचार करणारा हुशार पोलीस इन्स्पेक्टर रंगवला आहे. दोघांच्यातील पडद्यावरील संघर्ष प्रेक्षकांना नक्कीच आवडू शकतो. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड चित्रपटाकडे जी प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे त्यातून पुन्हा प्रेक्षक थिएटरकडे परत आणण्याचे काम विक्रम वेधा करु शकतो, असे ठीझर पाहून वाटते.
हृतिक आणि सैफसोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी बोलताना, दिग्दर्शक पुष्कर आणि गायत्री म्हणाले, सुपरस्टार हृतिक आणि सैफसोबत शूटिंग करणे हा एक अद्भुत अनुभव आहे, आमच्या सुपर टॅलेंटेड आणि अप्रतिम क्रूसह आम्ही स्क्रिप्ट स्तरावर ज्याची कल्पना केली होती ते साध्य करण्यात आम्ही सक्षम ठरलो आहोत.
विक्रम आणि बेताल या भारतीय लोककथेवर आधारित हा चित्रपट गुंड वेधाला पकडून मारणाऱ्या विक्रम या कठोर पोलीस अधिकाऱ्याची कथा आहे. या चित्रपटात सैफ अली खान विक्रमची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात राधिका आपटेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.'विक्रम वेधा' हा त्याच नावाच्या तमिळ ब्लॉकबस्टर चित्रपटाचा रिमेक आहे. आर माधवन आणि विजय सेतुपती यांनी तमिळ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. तमिळ चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे पुष्कर आणि गायत्री हे त्याच्या हिंदी रिमेकचे दिग्दर्शक आहेत. याची निर्मिती एस शशिकांत आणि भूषण कुमार यांनी केली आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी चित्रपट जगभरातील सिनेमागृहात रिलीज होणार आहे.
हेही वाचा - सोनाली फोगटच्या मृत्यूप्रकरणी गैरप्रकार झाल्याचा कुटुंबीयांना संशय