ETV Bharat / entertainment

Krishna Bhatt wedding : विक्रम भट्ट यांची मुलगी कृष्णा भट्टने वेदांत सारडाशी बांधली लग्नगाठ, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची हजेरी - कृष्णा आणि वेदांत सारडा विवाह

दिग्दर्शक विक्रम भट्ट यांची मुलगी कृष्णा भट्ट हिने तिचा दीर्घकाळचा प्रियकर वेदांत सारडाशी लग्नगाठ बांधली आहे. सनी लिओन आणि बॉबी देओल सारख्या मुंबईतील अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.

Krishna Bhatt wedding
कृष्णा आणि वेदांत सारडा विवाह
author img

By

Published : Jun 12, 2023, 2:26 PM IST

मुंबई - प्रसिद्ध चित्रपट निर्माते विक्रम भट्ट यांची मुलगी कृष्णा भट्ट रविवारी तिचा प्रियकर वेदांत सारडासोबत विवाहबंधनात अडकली. मुंबईत पार पडलेल्या या विवाह संमारंभाला तिचे तुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र मैत्रीणी हजर होते. विवाह प्संगी बॉलिवूड सेलेब्रिटींचीही वर्दळ पाहायला मिळाली. अभिनेता बॉबी देओलने यावेळी विशेष हजेरी लावली होती. कृष्णा आणि वेदांत सारडा बद्दल यांची डिसेंबर 2022 मध्ये एंगेजमेंट झाली होती.

बॉबी देओलने विक्रम भट्ट आणि त्याच्या कुटुंबासोबत फोटोंना पोज दिली. औपचारिक पोशाखात असलेल्या बॉबीने काळ्या पँटसह काळा शर्ट घातला होता. यावेळी महेश भट्ट त्यांची मुलगी पूजा भट्ट आणि इतर कुटुंबीयांसह दिसले. लेहेंगा परिधान केलेल्या अभिनेत्री सनी लिओनने पती आणि मुलांसह लग्नात हजेरी लावली होती. बालिका वधू फेम अविका गोर हिनेही लग्नसंमांरभात हजेरी लावली. ती लवकरच कृष्णा भट्ट निर्मित १९२० - हॉरर्स ऑफ द हार्ट या हॉरर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

कृष्णानेही इन्स्टाग्रामवर तिच्या लग्न समारंभातील फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये हे जोडपे हसताना आणि कॅमेऱ्यासाठी वेगवेगळ्या पोझ देताना दिसते. कार्यक्रमासाठी, कृष्णाने पिवळे आणि पांढरे पारंपारीक पोशाख आणि दागिने परिधान केले होते तर वेदांतने पांढरा पोशाख परिधान केला होता.

कृष्णा ही एक चित्रपट निर्माती आहे. ती 1920 - हॉरर्स ऑफ द हार्ट नावाचा चित्रपट घेऊन येणार आहे. हा चित्रपट महेश भट्ट आणि आनंद पंडित यांनी प्रेझेन्ट केला आहे आणि राज किशोर खवरे यांच्या संयुक्त विद्यमाने विक्रम भट्ट प्रॉडक्शनने याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 23 जून रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

हेही वाचा -

१. खास मराठी प्रेक्षकांसाठी बहुभाषिक ‘1 ओटीटी’ च्या मराठी प्रभागाचा शुभारंभ, स्वप्नील जोशी असेल 'ब्रँड फेस'!

२. Rubina Dilaik Car Accident: बिग बॉस फेम रुबिनाच्या कारचा अपघात; ट्विट करून दिले हेल्थ अपडेट

३. Mangal Dhillon Death: जुनूनमधून गाजलेले अभिनेते मंगल ढिल्लन काळाच्या पडद्याआड, कर्करोगाने प्रकृती होती गंभीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.