मुंबई - कलाकार जोडपे तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा लस्ट स्टोरी 2 च्या रिलीजच्या प्रतीक्षेत आहेत. अलीकडेच त्यांच्या नात्याची कबुली दोणारे हे जोडपे पहिल्यांदाच स्क्रीन स्पेस शेअर करणार आहेत. एका मुलाखतीत, तमन्नाने शेअर केले की लस्ट स्टोरीज 2 सह, तिने प्रथमच तिची 'नो-किस पॉलिसी' सोडली. तिने विजयला याबद्दल सांगितल्यानंतर प्रतिसाद म्हणून तो फक्त 'धन्यवाद' एवढेच बोलू शकला. लस्ट स्टोरीमध्ये विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांच्यामध्ये इंटिमेट सीन्स आहेत.
सलस्ट स्टोरीज २ साठी तमन्नाने नो किस पॉलिसीला दिला पूर्ण विराम - आता जवळपास दोन दशके झाली आहेत, आणि तमन्नाने इंडस्ट्रीत नेहमीच तिची 'नो-किस पॉलिसी' कायम ठेवली आहे. ती हिंदी, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये तिच्या अनेक भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. अलीकडेच, एका मुलाखतीत विजयने सांगितले की, मी तिला (तमन्ना) सुजॉय घोषच्या ऑफिसमध्ये वाचनासाठी भेटलो आणि मला वाटते की आम्ही तिथे आइस ब्रेक केले. तिने सांगितले की ती 17 वर्षांपासून काम करत आहे. तिची नो-किस पॉलिसी तिच्या करारात असते. आणि मग, ती म्हणाली की , 'मी याआधी असे काहीही केले नाही. शेवटी, तिने मला सांगितले की मी पहिली अभिनेत्री आहे जी ती ऑनस्क्रीन किस करणार आहे. आणि माझी प्रतिक्रिय 'धन्यवाद' अशीच होती.'
तमन्ना भाटियाची वर्कफ्रंट - लस्ट स्टोरीज 2 चा प्रीमियर 28 जून रोजी नेटफ्लिक्सवर होणार आहे. काजोल, नीना गुप्ता, तिलोतमा शोम, मृणाल ठाकूर, कुमुद मिश्रा, अमृता सुभाष आणि अंगद बेदी या लस्ट स्टोरीज 2 मधील कलाकारांचा समावेश आहे. सुजॉय घोष, आर बाल्की, अमित रविंदरनाथ शर्मा आणि कोंकणा सेन शर्मा यांनी दिग्दर्शन केले आहे. दरम्यान, तमन्ना सध्या जी कारदा या प्राइम व्हिडीओ मालिकेत दिसली आहे. अरुणिमा शर्मा दिग्दर्शित, या मालिकेत सुहेल नय्यर, आशिम गुलाटी आणि अन्या सिंग देखील आहेत.
हेही वाचा -
१. Kriti Sanon Adipurush : क्रिती सेनॉनने स्वतःचे मनोरंजन करत केली एक पोस्ट...
२. Ileana D'Cruz reveals : 'बाळाच्या हृदयाचे ठोके पहिल्यांदा ऐकले', इलियाना डिक्रूझने सांगितला अनुभव
३. poster of Dha Lekacha : ‘ढ लेकाचा’ पोहोचला पंढरपुरात विठ्ठलाच्या दारी!