ETV Bharat / entertainment

Kushi Movie shoot video : विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभूने 'कुशी' शूटमधील बीटीएस व्हिडिओ शेअर केला - टॉलीवूड

टॉलिवूड स्टार विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभूचा 'कुशी' या चित्रपटाच्या शूटवरील व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओमध्ये मजा मस्ती करतांना दोघे दिसत आहे. त्यांच्यातील केमिस्ट्री पाहून चाहते खूश झाले आहेत.

Vijay Deverakonda and  Samantha Ruth Prabhu
विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभू
author img

By

Published : May 12, 2023, 5:46 PM IST

हैदराबाद: विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभू, यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'कुशी'मध्ये प्रमुख भूमिका साकारत आहे. सामंथाने तिच्या इस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात दोघांमधील केमिस्ट्री ही आग लावून टाकणारी आहे. या व्हिडिओमध्ये 'कुशी' या चित्रपटाच्या सेटवर समंथा ही तिच्या सहकलाकारसोबत सुंदर क्षण घालवतांना दिसत आहे. आता ही क्लिप आणखी खास बनवणारी गोष्ट म्हणजे विजय देवरकोंडाने सामंथाला नकळतपणे पकडले आहे. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या व्हिडिओवर अनेक कमेंट युजर करत आहे. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. विजय देवरकोंडा आणि सामंथाचे चाहते यांच्यातील केमिस्ट्रीची प्रशंसा करतांना दिसत आहे. व्हिडिओमध्ये त्यांच्या आगामी कुशी चित्रपटाच्या शूटमधील बीटीएस सीन्स आहेत.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया : कमेंट विभागात अनेकांनी लिहिले, ही खूप खास ही जोडी आहे. दुसर्‍याने कमेंटमध्ये लिहले आहे की, तुम्हाला एकत्र पाहून आनंदी होत आहे. तर तिसऱ्याने लिहले, 'तुम्ही एकत्र छान दिसता.,' अशा अनेक प्रकारच्या कमेंट या व्हिडिओवर येत आहे. या व्हिडिओला अनेकजण लाईक आणि शेअर देखील करत आहे. या चित्रपटातील नवीन आणि रोमँटिक गाण्याचे ट्रॅक वाजत असल्याने या चित्रपटासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहे. ९ मे रोजी विजयचा वाढदिवस आहे. त्यानिमित्याने चाहत्यांसाठी भेट म्हणून एक गाणे रिलीज करण्यात येणार आहे. अनेक चाहत्यांनी चित्रपटाच्या प्रीमियरसाठी त्यांचा उत्साह व्यक्त केला आहे, असे सांगितले जात आहे की, प्रेक्षक त्यांच्यातील ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाहीत. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अनेकजण वाट बघत आहे.

चित्रपटाची स्टार कास्ट: या चित्रपटात सहकलाकारांमध्ये जयराम, सचिन खेडाकर, लक्ष्मी, अली, रोहिणी, मुरली शर्मा, वेनेला किशोर, राहुल रामकृष्ण, श्रीकांत अय्यंगार आणि सरन्या हे आपल्या रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. सामंथासाठी 'कुशी' हा चित्रपट महत्त्वपूर्ण राहणार आहे. कारण तिची मागील रिलीज शकुंतलम बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी करू शकली नाही. 'कुशी' 1 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा : Kriti Sanon recalls sobbing : 'पहिल्या फोटोशूटनंतर घरी येऊ रडले होते', क्रिती सेनॉनने केला खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.