ETV Bharat / entertainment

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेचा ‘लायगर’ चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार - लायगर चित्रपट डिस्ने हॉटस्टारवर रिलीज होणार

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचा ‘लायगर’ हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. डिस्ने हॉटस्टारने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती शेअर केली आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Sep 22, 2022, 5:29 PM IST

मुंबई - दाक्षिणात्य स्टार विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचा ‘लायगर’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. मात्र या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला थंड प्रतिसाद मिळत होता. १२० कोटी रुपयांचं बजेट असलेला लायगर बॉक्स ऑफिसवर कसाबसा ४० कोटी रुपयांच्या आसपासच कमाई जमवू शकला.

दाक्षिणात्य स्टार विजय देवरकोंडाचा हा बॉलिवूड पदार्पणाचा चित्रपट होता. त्यामुळे त्याला मोठ्या अरपेक्षा होत्या. त्याचा डॅशिंग लूक पाहून चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. विजयसह अनन्याने देशभर फिरून जोरदार प्रमोशन केले होते. मात्र जोरदार प्रमोशन करूनही चित्रपट मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. चित्रपटाची हाईप वाढवण्यासाठी वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर माइक टायसनलाही महत्त्वाची भूमिका देण्यात आली होती, तरीही चित्रपटाची जादू चाहत्यांवर चालली नाही.

आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. डिस्ने हॉटस्टारने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती शेअर केली आहे. त्यामुळे हा चित्रपट आता आपल्याला ‘डिस्ने हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.

मुंबई - शनाया कपूरच्या ग्लॅमरस निळ्या पोशाखातील फोटोवर बीएफएफ सुहाना खानची प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.