ETV Bharat / entertainment

Vicky Kaushal Janmashtami 2023 : विक्की कौशलने साजरी केली बाळगोपाळांसोबत दहीहंडी, पाहा लक्षवेधी फोटो - श्रीकृष्ण जन्माष्टमी

Vicky Kaushal Janmashtami 2023: आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा गोपाळकाला असल्यानं विक्कीनं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो लहान मुलांसोबत उत्सव साजरा करताना दिसत आहे.

Vicky Kaushal Janmashtami 2023
विक्की कौशल जन्माष्टमी 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2023, 5:58 PM IST

मुंबई Vicky Kaushal Janmashtami 2023 : आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा गोपाळकाला असल्यानं ठिकठिकाणी दहीहंडीचा उत्साह साजरा केला जात आहे. आज मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रातमध्ये गोविंदा पथकं विविध ठिकाणी दहीहंडी फोडतात. आता बॉलिवूड स्टार विक्की कौशल देखील हा उत्सव साजरा करण्यासाठी खूप उत्सुक आहे. सध्या विक्की त्याचा आगामी चित्रपट 'द ग्रेट इंडियन फॅमिली'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. 'द ग्रेट इंडियन फॅमिली' या चित्रपटामधील यापूर्वी 'कन्हैया ट्विटर पे आजा' हे गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्याला चाहत्यांनी खूप पसंत केलं होतं. याशिवाय काहीजणांनी या गाण्यावर टीका करत हिंदू संस्कृतीची चेष्टा करत असल्याचे आरोप केले होते.

विक्की कौशलनं शेअर केले फोटो : विक्कीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, भजन कुमार आणि आमच्या लाडक्या कन्हैयाकडून तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. विक्कीचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. त्याला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. यापूर्वी विक्कीने 'जरा हटके जरा बचके' चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं होतं. या चित्रपटने रुपेरी पडद्यावर खूप नोटा छापल्या होत्या. 'जरा हटके जरा बचके'मध्ये विक्कीसोबत सारा अली खान देखील होती. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. आता विक्की कौशल 'द ग्रेट इंडियन फॅमिली' या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना हसवण्यासाठी येत आहे.

विक्की मुंबईतील दहीहंडी समारंभात सहभागी होणार : विक्की कौशलने आणखी एक पोस्ट त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या पोस्टमध्ये फेस्टिव्हलबद्दल बोलताना त्याने आपल्या बालपणीची आठवण करून देत सांगितले, 'मुंबईतील एका दहीहंडी समारंभात सहभागी होणार आहे, हा एक लोकप्रिय खेळ आहे जो भगवान कृष्णाचा आदर म्हणून साजरा केला जातो'. विक्कीच्या या पोस्टवर अनेजण कमेंट करत त्याला चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहे. याशिवाय या पोस्टला अनेकजण लाईक करत यावर हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत. 'द ग्रेट इंडियन फॅमिली' या चित्रपटामध्ये विक्की एका वेगळ्या अंदाजामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली झालेला आहे. या चित्रपटामध्ये विक्की कौशलसोबत मानुषी छिल्लर दिसेल. विजय कृष्ण आचार्यने 'द ग्रेट इंडियन फॅमिली'चे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट 22 सप्टेंबर रोजी रिलीज होईल.

हेही वाचा :

  1. Jawan Box Office Collection : पहिल्याच दिवशी शाहरुख खान स्टारर 'जवान' चित्रपट घेणार मोठी झेप...
  2. Jawan Day १ Box Office : शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट चाहत्यांवर करत आहे जादू...
  3. Shah Rukh Khan Jawan Movie : 'जवान' चित्रपटाद्वारे शाहरुख खाननं जिंकली चाहत्यांची मनं...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.