ETV Bharat / entertainment

Trailer Date Out : विकी कौशल स्टारर 'सॅम बहादूर'चा ट्रेलर होणार 'या' तारखेला रिलीज - सॅम बहादूरचा ट्रेलर होणार रिलीज

Trailer Date Out : विकी कौशलचा आगामी चित्रपट 'सॅम बहादूर'च्या ट्रेलरच्या रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 7 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Trailer Date Out
ट्रेलरची तारीख आली समोर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 6, 2023, 5:16 PM IST

मुंबई - Trailer Date Out : विकी कौशलचा आगामी चित्रपट 'सॅम बहादूर' हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान या चित्रपटाचे निर्माते 7 नोव्हेंबर रोजी या चित्रपटाचं ट्रेलर रिलीज करण्याच्या तयारीत असल्याचं समजत आहे. विक्की कौशलनं त्याच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर करून ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर केली आहे. त्यानं या चित्रपटामधील एक पोस्टर शेअर केलं आहे. आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करताना विकीनं लिहलं, 'ही कथा त्या माणसाची आहे, ज्यानं आपलं आयुष्य भारतीय सैन्यासाठी आणि राष्ट्रासाठी समर्पित केले. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार आहे.'

'सॅम बहादूर'चा ट्रेलर होणार प्रदर्शित : 'सॅम बहादूर' 1.12.2023 थिएटरमध्ये असं या पोस्टवर लिहिलंय. पोस्टरमध्ये विकी सैन्यचा गणवेश घालून फिरताना दिसतोय. तो रांगेत उभ्या असलेल्या सैनिकांची तपासणी करत आहे. या चित्रपटातील विकीचा लूक खूपच इंटेन्स आहे. हे पोस्टर शेअर होताच चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रिया देण्यापासून सुरुवात केली आहे. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहलं, 'सुपर एक्साईटेड' हा चित्रपट मी नक्कीच पाहणार'. दुसऱ्या एकानं लिहलं, 'मोस्ट अवेटेड सॅम बहादूर'. याशिवाय आणखी एकानं लिहल, 'हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई करणार आहे'. या पोस्टवर अनेकजण हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत. विकी कौशल हा 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' चित्रपटानंतर भारतीय सैनिकाच्या भूमिकेत दुसऱ्यांदा दिसेल.

'सॅम बहादूर' चित्रपटाची स्टारकास्ट : 'सॅम बहादूर' या चित्रपटामध्ये विकी कौशल व्यतिरिक्त फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, एडवर्ड सॉननब्लिक, साकिब अयुब, मोहम्मद जिशान अय्युब आणि नीरज काबी हे कलाकार दिसणार आहेत. 'सॅम बहादूर' हा चित्रपट भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. सध्या या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. खऱ्या आयुष्यावर आधारित असलेली ही कहाणी प्रत्येक भारतीयांचं मनं जिंकेल. हा चित्रपट विकीसाठी खूप महत्वाचा आहे. या चित्रपटासाठी त्यानं खूप मेहनत घेतली आहे.

हेही वाचा :

  1. KH 234: कमल हसन आणि दुलकर सलमानचं 'केएच 234' चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज
  2. Tara Sutaria : तारा सुतारियानं एक आठवडा टाळली होती आंघोळ, 'अपूर्वा'साठी अनोखं समर्पण
  3. The Railway Men Trailer release : भोपाळ गॅस दुर्घटनाचा जीवघेणा थरार, 'द रेल्वे मेन'चा ट्रेलर प्रदर्शित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.