ETV Bharat / entertainment

Vicky Kaushal dedicates song : विक्की कौशलने पत्नी कॅटरिना कैफला इंस्टाग्राम स्टोरीवर एक गाणे केले समर्पित - विक्कीने गाणे केले समर्पित

अभिनेता विकी कौशलने त्याचा नवीन चित्रपट 'जरा हटके जरा बचके' यामधील एक गाणे पत्नी कॅटरिना कैफ समर्पित केले. त्यानंतर कॅटरिना देखील या चित्रपटासाठी अभिनंदन भावपूर्वक पोस्ट तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली.

jara hatke zara bachke
जरा हटके जरा बचके
author img

By

Published : Jun 3, 2023, 5:09 PM IST

मुंबई : बॉलिवूडमधील सुंदर जोडपे अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ बरेचदा चर्चेत असतात. सध्याला विक्की हा त्याचा चित्रपट 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटासाठी चर्चेत आहे. विक्कीने त्याची पत्नी कॅटरिना कैफला इंस्टाग्राम स्टोरीवर 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटामधील एक गाणे समर्पित केले आहे. त्यानंतर कॅटरिना कैफ देखील 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटासाठी एक अभिनंदन भावपूर्वक पोस्ट तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर केली. तसेच तिने कॅप्शनसह चित्रपटाचे पोस्टर शेअर करत, टीमचे अभिनंदन केले आहे. यानंतर विक्कीने चित्रपटातील 'फिर और क्या चाहिये' या गाण्याने कॅटरिना उत्तर दिले. 'तू है तो मुझे और क्या चाहिये' त्याने त्याच्या उत्तराला असे कॅप्शन दिले होते. त्याच्या दिलखुलास हावभावाने नेटकऱ्यांनी त्यांचे फार कौतुक केले.

Jara hatke zara bachke
जरा हटके जरा बचके

जरा हटके जरा बचके : विक्की कौशल आणि सारा अली खानचा चित्रपट सध्याला फार चर्चेत आहे, कारण या चित्रपटाचे सारा आणि विक्कीने फार जास्त प्रमोशन केले होते. याशिवाय या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी फार धमाल केला आहे, कारण या चित्रपटाने आतापर्यत 5.49 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तसेच बाय-1-गेट-1 फ्रि या ऑफरमुळे या चित्रपटाला फार फायदा झाला असे दिसून येत आहे. या चित्रपटाची शुटिंग ही इंदूरला झाली आहे. तसेच या चित्रपटाची कहाणी इंदूरमधील एका तरुण विवाहित जोडप्याची आहे, जे आपल्या कुटुंबासोबत राहून कंटाळले आहे. सरकारी योजनेतून घर घेण्यासाठी घटस्फोट घेण्याचे ते नाटक करतात आणि वेगळे होण्याचे अनेक प्रयत्न करतात. असे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे.

प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद : हा चित्रपट २ जून रोजी प्रदर्शित झाला आणि हा चित्रपट रूपेरी पडद्यावर फार कमाल करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केला आहे, ज्यांचा लुका छुपी हा चित्रपट देखील एक कौटुंबिक चित्रपट होता, जो त्यांच्या पालकांच्या माहितीशिवाय लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुण जोडप्याच्या अशाच परिस्थितीवर आधारित होता.

हेही वाचा :

  1. Box office collection : विक्की आणि साराची प्रेक्षकांना पसंत पडणार का? पहा 'जरा हटके जरा बचके' बॉक्स ऑफिस कलेक्शन
  2. Wedding Anniversary : अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला 50 वर्षे पूर्ण, श्वेता बच्चनने दिल्या खास शुभेच्छा
  3. Odisha train accident : सेलिब्रिटींनी ओडिशा ट्रेन अपघातावर व्यक्त केला शोक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.