ETV Bharat / entertainment

Seema Deo Death : 'या' प्रसिद्धी व्यक्तींनी वाहिली सीमा देव यांना श्रद्धांजली... - चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली

दिग्गज अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाल्याने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर अनेकजण त्यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करत आहेत.

Seema Deo Death
सीमा देव
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2023, 3:02 PM IST

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. मराठी चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी 'कोशिश', 'कोरा कागज' आणि 'आनंद' यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. सीमा देव यांनी शेवटी २००१ मध्ये 'जीवन संध्या' या चित्रपटामध्ये काम केले होते. अभिनेते रमेश देव यांच्या पत्नी तसेच अभिनेता अजिंक्य देव आणि दिग्दर्शक अभिनय देव यांची आई सीमा देव यांना गेल्या वर्षभरापासून एका आजाराने घेरले होते. सीमा देव या अभिनयसोबत त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी राहात होत्या. त्यांना अल्झायमर आजार झाला होता. सीमा देव यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ४.३० वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने मनोरंजन जगताची मोठी हानी झाली आहे.

अजिंक्य देव यांनी आजाराबद्दल केला खुलासा : सीमा देव यांचा मुलगा अजिंक्य देव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती आणि चाहत्यांना आईसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. २०२० मध्ये आईच्या प्रकृतीबद्दल ट्विट करून लिहले, 'माझी आई श्रीमती सीमा देव ही अल्झायमरने ग्रस्त आहेत. आम्ही संपूर्ण देव परिवार त्यांच्या तंदुरुस्तीसाठी प्रार्थना करत आहोत, त्यांच्यावर खूप प्रेम करणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रानेही त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी'. अशी पोस्ट केली होती.

सीमा देवना वाहली श्रद्धांजली : सीमा देवच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोक पसरला आहे. सोशल मीडियावर अनेकजण पोस्ट शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. सीमा देव यांना श्रद्धांजली वाहत एकनाथ शिंदे यांनी लिहिले, 'देव कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी असून सीमा देव यांना श्रद्धांजली अर्पण करतो'. असे त्यांनी लिहिले आहे. त्यानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी श्रद्धांजली वाहत पोस्टमध्ये लिहिले, 'मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिध्द अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाचे वृत्त दुखःद आहे'. अश्विनी भावेने श्रद्धांजली वाहत पोस्टमध्ये लिहले, 'सीमा ताईंच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख होत आहे. सीमाताईंचे पडद्यावरचे लोभस रूप आणि त्यांच्या तरल अभिनयाने मी लहान वयातच खूप प्रेरित झाले होते'. अशोक सराफ यांनी देखील सीमा देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अशा अनेक प्रकारच्या पोस्ट ट्विटवर आल्या आहेत.

'मिया बीबी राजी' या चित्रपटातून केले पदार्पण : सीमा देव यांनी १९६०च्या 'मिया बीबी राजी' या चित्रपटातून पदार्पण केले होते. सीमा यांचा विवाह अभिनेता रमेश देव यांच्याशी झाला होता. रमेश देव यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. रमेश देव यांचे २ फेब्रुवारी २०२२ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सीमा देव यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'आनंद' चित्रपटात काम केले होते. ज्यात त्यांनी रमेश देव यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती आणि रमेश देव यांनी 'आनंद'मध्ये अमिताभ बच्चन यांचे मित्र डॉ. प्रकाश कुलकर्णी यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अमिताभ त्याना वहिनी म्हणायचे.

हेही वाचा :

  1. Alia Bhatt And Ramayana : आलिया भट्ट नितेश तिवारीच्या 'रामायण' चित्रपटामधून पडली बाहेर
  2. Jailer movie box office collection day 14 : सुपरस्टार रजनीकांतचा 'जेलर' चित्रपट देशांतर्गत लवकरच पार करेल ३०० कोटीचा आकडा...
  3. Seema Deo Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे दीर्घ आजारानं निधन, आज मुंबईत होणार अंत्यसंस्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.