ETV Bharat / entertainment

Salim Ghous dies : ज्येष्ठ अभिनेता सलीम घौस यांचे वयाच्या ७० व्या वर्षी हृदयविकाराने निधन - Salim Ghous dies of heart attack

"भारत एक खोजा", "वागले की दुनिया", "ये जो है जिंदगी" आणि "सुबाह" मधील भूमिकांसाठी ओळखल्या जाणार्‍या सलीम घौस यांनी बॉलिवूड आणि दक्षिण भारतात समान लोकप्रियता मिळवली. त्यांनी अनेक मोठ्या स्टार्स आणि बॅनर्ससोबत काम केले. 1978 मध्ये त्यांनी "स्वर्ग नरक" मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

सलीम घौस
सलीम घौस
author img

By

Published : Apr 29, 2022, 1:03 PM IST

मुंबई - ज्येष्ठ रंगमंच, दूरचित्रवाणी आणि चित्रपट अभिनेता सलीम घौस यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 70 वर्षीय घौस यांना बुधवारी उशिरा वर्सोवा येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु ते बरे झाले नाहीत, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. चेन्नईमध्ये जन्मलेल्या आणि तिथेच शिक्षण घेतलेलेल्या सलमी घोस यांनी एफटीआयआय, पुण्यातून पदवी प्राप्त केली आणि नंतर त्यांनी रंगमंचावर काम सुरू केले होते.

"भारत एक खोजा", "वागले की दुनिया", "ये जो है जिंदगी" आणि "सुबाह" मधील भूमिकांसाठी ओळखल्या जाणार्‍या सलीम घौस यांनी बॉलिवूड आणि दक्षिण भारतात समान लोकप्रियता मिळवली. त्यांनी अनेक मोठ्या स्टार्स आणि बॅनर्ससोबत काम केले. 1978 मध्ये त्यांनी "स्वर्ग नरक" मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. नंतर, त्यांनी "चक्र" (1981), "सारांश" आणि "मोहन जोशी हाजीर हो!" सारख्या अनेक पुरस्कार विजेत्या चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका केल्या. (दोन्ही 1984). ते शाहरुख खानसोबत ‘कोयला’ या चित्रपटात दिसले होते. त्याशिवाय ‘मुजरिम’, ‘शपथ’, कमल हसनचा ‘वेत्री विझा’, मोहनलालचा ‘थजवरम’ आणि ‘वेल डन अब्बा’ या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. तामिळ चित्रपट "का" (2022) मध्ये ते अखेरचे दिसले होते.

हेही वाचा - Irrfan Khan Memorial Day : इरफान खान स्मृतिदिन : दिवंगत अभिनेत्याची दुसरी पुण्यतिथी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.