मुंबई - Vande Mataram to be launched at wagah border : साऊथ अभिनेता वरुण तेज आणि मानुषी छिल्लर स्टारर अॅक्शन-थ्रिलर चित्रपट 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' रिलीजसाठी सज्ज आहे. दरम्यान, या चित्रपटाशी संबंधित एक अपडेट समोर येत आहे. वरुण तेज-मानुषीच्या 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' चित्रपटातील 'वंदे मातरम' हे गाणं वाघा येथे लॉन्च होणार आहे. 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' टीम अमृतसरच्या वाघा बॉर्डरवर 'वंदे मातरम' हे गाणं लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटाची अनेकजण वाट पाहात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 'ऑपरेशन व्हॅलेंटाइन'मधील गाणं वाघा बॉर्डरवर परेड दरम्यान लॉन्च करण्यात येणार आहे.
वरुण-मानुषी वाघा बॉर्डर जाणार : प्रजासत्ताक दिन सप्ताहादरम्यान हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. याटी भव्य झलक प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पॅन इंडिया चित्रपटात वरुण तेजसोबत मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट भारतीय हवाई दलाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. हा एरियल अॅक्शन-थ्रिलर चित्रपट 16 फेब्रुवारी 2024 रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरुण तेज आणि मानुषी छिल्लर वाघा बॉर्डरवर परेडमध्ये सहभागी होऊन गाण्याचे लाँचिंग करणार आहेत. या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच मानुषी आणि वरुणची जोडी पडद्यावर प्रेक्षकांना पाहिला मिळणार आहे.
'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' : वाघा बॉर्डरवर फीचर फिल्मचे गाणे लॉन्च करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे गाणे मिकी जे यांनी लिहिलंय. या गाण्याला मेयर यांनी संगीत दिले असून संगीतकार सुखविंदर सिंग यांनी हिंदी आवृत्तीमधील गाणं गायलं आहे. तर, या गाण्याचं तेलुगू व्हर्जन अनुराग कुलकर्णीनं गायलंय. 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन'ची निर्मिती सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रॉडक्शन्स, संदीप मुड्डा यांच्या रेनेसान्स पिक्चर्सने केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शक्ती प्रताप सिंग गडा यांनी केलंय. सत्य घटनांनी प्रेरित असलेला, 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' हा मनोरंजन करणारा चित्रपट आहे. यात वरुण तेज यांनी अर्जुन देव आणि मानुषी छिल्लर यांनी रडार ऑफिसरची भूमिका साकारली आहे.
हेही वाचा :