मुंबई - अभिनेत्री मानुषी छिल्लर आणि वरुण तेजच्या आगामी चित्रपटाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' असे शीर्षक असलेला हा चित्रपट ८ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये झळकणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोमवारी ही घोषणा केली. भारताचा आजवरची सर्वात मोठी एअर फोर्स अॅक्शन फिल्म असल्याचा दावा, निर्माते करत आहेत. सत्य कथेवर आधारित असलेला हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू भाषेत एकाच वेळी चित्रीत केला जात आहे.
जाहिरात निर्माते, सिनेमॅटोग्राफर आणि व्हिएफएक्सचे उत्तम जाणकार शक्ती प्रताप सिंग हाडा या चित्रपटाच्या निर्मितीतून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहेत. याच चित्रपटातून वरुण तेजचीही बॉलिवूडमध्ये एन्ट्री होणार आहे. 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' चित्रपटाची निर्मिती सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रॉडक्शन्स आणि संदिप मुड्डा याच्या रेनीसन्स पिक्चर्स आणि सहनिर्माते गॉड ब्लेस एंटरटेन्मेंटचे नंदकुमार अभिनेनी करत आहेत. शक्ती प्रताप सिंग हाडा, आमिर खान आणि सिद्धार्थ राज कुमार यांनी लिहिलेला हा चित्रपट तेलूगू आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.
'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' या चित्रपटातून हिंदीत पदार्पण करणारा वरुण तेज या चित्रपटात इंडियन एअर फोर्सचा पायलट म्हणून भूमिका साकारणार आहे. तर मानुषी छिल्लर या चित्रपटात रडार ऑफिसरची भूमिका करत आहे. सोमवारी वरुणने इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले. '८ डिसंबर रोजी भारताच्या गर्जनेचा आवाज दुमदुमेल आणि याचे प्रतिध्वनी आकाशात गुंजतील, ऑपरेशन व्हॅलेंटाईन.', असे कॅप्शन त्याने पोस्टला दिले आहे.
निर्मात्यांनी 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' चित्रपटाबद्दल दिलेल्या या नव्या अपडेटमुळे वरुण तेज आणि मानुषी छिल्लरच्या चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. सम्राट पृथ्वीराज या ऐतिहासिक चित्रपटात संयोगिताची भूमिका साकारल्यानंतर मानुषी छिल्लरचा हा दुसरा चित्रपट आहे. २०२२ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता.
मानुषी छिल्लरने यशराज फिल्म्ससोबत तीन चित्रपटांचे अॅग्रीमेंट केले आहे. तिचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा विजय कृष्णा आचार्य दिग्दर्शित दुसरा चित्रपट आहे. या विनोदी चित्रपटात ती विकी कौशलसोबत भूमिका साकारणार आहे. याशिवाय मानुषी, दिनेश विजानच्या आगामी चित्रपटात तेहरान आणि जॉन अब्राहमसोबत काम करणार आहे.
हेही वाचा -
१. Kangana Ranaut : कंगना रणौतने 'चंद्रमुखी २'मध्ये केले भरतनाट्यम ; पण नृत्यामुळे झाली ट्रोल
३. Bigg Boss OTT 2 finale : अंतिम फेरीपूर्वी अभिषेक मल्हान रुग्णालयात दाखल, चाहत्यांची काळजी वाढली