मुंबई :अभिनेता वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांचा आगामी चित्रपट 'बवाल' जुलैमध्ये प्रदर्शित होत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नितेश तिवारी आणि साजिद नाडियादवाला यांचा 'बवाल' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट जगातील 200 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकतीच या चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी याबाबत माहिती दिली आहे. आता या चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. 'बवाल' या चित्रपटाचा प्रीमियर फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील आयफेल टॉवर येथे होणार आहे. 'बवाल' हा भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट ठरणार ज्याचे आयफेल टॉवर प्रीमियर होईल. या घोषणेसोबतच जान्हवी आणि वरुणचे रोमँटिक पोस्टरही शेअर करण्यात आले आहे.
आयफेल टॉवरवर प्रीमियर होणार : मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयफेल टॉवरवर प्रीमियर होणारा 'बवाल' हा पहिला भारतीय चित्रपट असेल, ज्याचा प्रीमियर सल्ले गुस्ताव आयफेल येथे होईल. या प्रीमियरला वरुण धवन, जान्हवी कपूर, चित्रपट निर्माता साजिद नाडियादवाला आणि दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्याशिवाय चाहते आणि फ्रेंच प्रतिनिधी देखील प्रीमियरला उपस्थित राहतील.
या चित्रपटाचा पॅरिसशी संबंध आहे : 'बवाल' या चित्रपटाचे जागतिक स्तरावर प्रमोशन करण्यासाठी चित्रपट निर्माते तयारी करत आहेत आणि ते सिटी ऑफ लव्ह पॅरिसपासून याची सुरुवात करत आहेत. या चित्रपटाचा पॅरिसशी थेट संबंध असल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे 'बवाल' या चित्रपटात दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमीही दाखवण्यात येणार आहे. दुसऱ्या महायुद्धात फ्रान्सचाही सहभाग होता. त्याचबरोबर चित्रपटातील अनेक रोमँटिक सीन्सही शूटही येथे करण्यात आले आहेत. हा प्रीमियर कधी होणार याची माहिती निर्माते लवकरच देतील.
वर्कफ्रंट : वरुण धवनच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो, लवली सिंह, थोडा तो मजा लेले, मिस्टर लेले, इक्कीस, रणभूमि भेड्या या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. याशिवाय जान्हवी कपूरच्या कामाबद्दल बोलयला गेले तर ती, देवरा, बॉम्बे गर्ल बडे मियाँ छोटो मियाँ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :