ETV Bharat / entertainment

Urvashi Rautela Iphone : भारत-पाकिस्तान सामना पाहणं पडलं महागात; उर्वशी रौतेलाचा सोन्याचा 'आयफोन' हरवला - Urvashi Rautela lost Gold Iphone

Urvashi Rautela Iphone: अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी ती क्रिकेटर ऋषभ पंतसोबतच्या कथित रिलेशनशिमुळे चर्चेत आली होती. आता तिच्यासोबत एक विचित्र घटना घडली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान तिचा सोन्याचा आयफोन हरवला. वाचा पूर्ण बातमी

Urvashi Rautela Lost her Iphone
उर्वशी रौतेलाचा आयफोन हरवला
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 15, 2023, 7:19 PM IST

मुंबई Urvashi Rautela Iphone : अभिनेत्री उर्वशी रौतेला शनिवारी भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचली होती. ती तिथे भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी गेली होती. मात्र हा सामना पाहणं आता उर्वशी रौतेलाला महागात पडलंय.

सोन्याचा आयफोन हरवला : हा सामना पाहत असताना उर्वशी रौतेलाचा सोन्याचा आयफोन हरवला. तिनं स्वत: ट्विट करून चाहत्यांना ही माहिती दिली. तिनं लोकांना आवाहन केलं आहे की जर कोणाला तिचा फोन सापडला असेल त्यांनी तिची मदत करावी. उर्वशी हा सामना पाहण्यासाठी सुंदर निळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून पोहचली होती. यावेळी अनेकांच्या नजरा तिच्यावर होत्या.

आयफोन २४ कॅरेट सोन्याचा होता : उर्वशी रौतेलानं ट्विटरवर लिहिलं की, 'अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये माझा २४ कॅरेटचा गोल्ड आयफोन हरवला आहे. जर कोणाला तो सापडला तर कृपया माझ्याशी लवकरात लवकर संपर्क साधा.' उर्वशी रौतेलानं तिच्या पोस्टमध्ये अहमदाबाद पोलीस आणि मोदी स्टेडियमला ​टॅग केलंय. अहमदाबाद पोलिसांनी या पोस्टवर उत्तर देत, 'मोबाइल फोनचे तपशील शेअर करा', असं म्हटलंय.

सोशल मीडियावर ट्रोल : या घटनेनंतर उर्वशी रौतेला पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. काही जणांनी ही पोस्ट पाहून तिला चक्क ट्रोल करणं सुरू केलं. अनेक चाहत्यांनी उर्वशी रौतेलाला दिलासा दिलाय, तर अनेकांनी तिची मजाही घेतली. एका यूजरनं ट्विट करत म्हटलं की, 'मग यात माझा फायदा काय. मला काय मिळत आहे?' दुसऱ्या एकानं यूजरनं लिहिलं, 'तुम्हाला तिथे जायला कोणी सांगितलं?' आणखी एका चाहत्यानं लिहिलं, 'आज सकाळी स्टेडियम झाडताना मला सापडला'. काही यूजर्सनं म्हटलं की, ही लक्ष वेधण्यासाठी काहीही करते. आणखी एकानं लिहिलं, 'पंत घेऊन गेला आहे का ते पहा'. एकानं तर चक्क वैयक्तिक नंबर मला पाठवा असं देखील म्हटलंय. उर्वशी रौतेला प्रसिद्ध क्रिकेटर ऋषभ पंतसोबत कथित रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्यांनी चर्चेत आली होती.

हेही वाचा :

  1. Maadi Song Out : नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलं 'हे' गाणं; पाहा व्हिडिओ...
  2. Priyanka Chopra and Nick jonas : निक जोनासनं पत्नी प्रियांका चोप्रा आणि मुलगी मालती मेरीसह इंस्टाग्रामवर फोटो केले शेअर...
  3. Singham Again: दीपिका पदुकोणनं 'सिंघम अगेन'मधील शेअर केला लेडी सिंघमचा लूक, रणवीर सिंगनं 'ही' दिली प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.