ETV Bharat / entertainment

उर्फी जावेद दुबई पोलिसांच्या ताब्यात, व्हिडिओ शूट करणे पडले महागात - उर्फी अलीकडेच दिसली होती

दुबईमध्ये व्हिडिओ शूट केल्यानंतर उर्फी जावेदला ताब्यात घेण्यात आले आहे. अभिनेत्री आणि सोशल मीडिया व्यक्तिमत्व, ही तिच्या अपारंपरिक फॅशन निवडींसाठी ओळखला जाते. बंदी असलेल्या ठिकाणी ती अतरंगी पोशाखात शूट करत असल्याने तिच्यावर कारवाई झाली आहे.

उर्फी जावेद दुबई पोलिसांच्या ताब्यात
उर्फी जावेद दुबई पोलिसांच्या ताब्यात
author img

By

Published : Dec 22, 2022, 12:11 PM IST

मुंबई - अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी पोशाखाबद्दल ओळखली जाते. तिच्या हटके फॅशनची चर्चा सोशल मीडियावर तर नेहमी रंगत असते. पण असे पोशाख सार्वजनिक ठिकाणी वापरणे तिला महागात पडले आहे. दुबईला सुट्टीसाठी गेलेल्या उर्फीने असेच अतरंगी कपडे घातल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. सध्या दुबईतील अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात आहे.

उर्फी अलीकडेच तिच्या आगामी प्रोजेक्ट्सच्या शूटिंगसाठी संयुक्त अरब अमिरातीला रवाना झाली होती आणि एक आठवड्यापेक्षा जास्त काळ ती तिथे आहे. अपारंपरिक पोशाख परिधान करून ती तिच्या प्रवासातील व्हिडिओ आणि फोटो शेअर करत आहे. तिने सार्वजनिक ठिकाणी शूट करण्याची परवानगी नसलेले काहीतरी परिधान करून ‘खुल्या भागात’ व्हिडिओ केल्याबद्दल दुबई पोलिसांनी तिची चौकशी केल्याचे समजते आहे.

मिळालेल्या अहवालानुसार उर्फीच्या पोशाखात गैर काही नव्हते मात्र बंदी असलेल्या क्षेत्रात ती व्हिडिओ शूट करत असल्यामुळे दुबई पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि चौकशी केली. या चौकशीमुळे उर्फीचे भारतात परतणे लांबणीवर पडू शकते.

अभिनेत्री सनी लिओन आणि अर्जुन बिजलानी यांनी होस्ट केलेल्या स्प्लिट्सविला X4 या डेटिंग रिअॅलिटी शोमध्ये उर्फी अलीकडेच दिसली होती. तिने शोमधील तिच्या पोशाखांसाठी देखील लक्ष वेधून घेतले. गेल्या महिन्यात, लेखक चेतन भगत यांनी या देशातील तरुण, विशेषत: मुले तिच्यापासून विचलित होत आहेत, असे सांगितल्यानंतर उर्फी देखील चर्चेत आली होती. तिने चेतनच्या टीकेला 'विकृत' संबोधून प्रतिसाद दिला होता आणि MeToo चळवळीदरम्यान 2018 मध्ये लीक झालेल्या चेतनच्या कथित व्हॉट्सअॅप संदेशांचे स्क्रीनशॉट देखील शेअर केले होते.

याआधी, उर्फी एका म्युझिक व्हिडिओमुळे कायदेशीर अडचणीत सापडली होती ज्यात तिला इतर पोशाखांबरोबरच केशरी साडीमध्ये दाखवण्यात आले होते. झीनत अमान या लोकप्रिय गाण्याच्या 'हाय हे ये मजबूरी'च्या रिमेकमध्ये ती दिसली होती. या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ 11 ऑक्टोबर रोजी रिलीज झाला. व्हिडिओ समोर आल्यानंतर, 'लैंगिक कृत्ये असलेली सामग्री प्रकाशित किंवा प्रसारित केल्याबद्दल' उर्फी विरुद्ध दिल्लीत तक्रार दाखल करण्यात आली होती.

हेही वाचा - झूमे जो पठाणवर थिरकले शाहरुखसह दीपिका पदुकोण, पठाणमधील दुसरे गाणे रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.