ETV Bharat / entertainment

मुंबई पोलिसांच्या वार्षिक कार्यक्रमात 'या' कलाकारांनी लावली हजेरी - मुंबई पोलिसांच्या वार्षिक कार्यक्रम

Umang 2023: मुंबई पोलिसांच्या वार्षिक कार्यक्रमात हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Umang 2023
उमंग 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 24, 2023, 12:20 PM IST

मुंबई Umang 2023 : मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री उमंग या वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते, यामध्ये शाहरुख खान, सलमान खान, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, आलिया भट्ट, रणबीर कपूर, बॉबी देओल, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी यांच्यासह अनेक नामांकित सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 'उमंग 2023' पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेले सेलिब्रिटी अतिशय ग्लॅमरस अंदाजात दिसले. दरम्यान सोशल मीडियावर काही सेलेब्सचे काही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. दरम्यान या वर्षी प्रदर्शित झालेला 'अ‍ॅनिमल'नं बॉक्स ऑफिसवर चांगलचं वादळ निर्माण केलं आहे. रणबीर कपूरचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर हा चित्रपट आहे.

बॉबी आणि रणबीरचा स्पेशल बॉन्ड : या चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका बॉबी देओलनं साकारली आहे. 'अ‍ॅनिमल'चं दिग्दर्शन संदीप वंगा रेड्डी यांनी केलं आहे. दरम्यान प्रत्येक शो आणि प्रत्येक फंक्शनमध्ये बॉबीची उपस्थिती पाहायला मिळत आहे. मुंबईत 'उमंग 2023' मध्ये रणबीर आणि बॉबी उपस्थित होते. 'अ‍ॅनिमल'चे दोन्ही स्टार्स या कार्यक्रमादरम्यान खूप प्रेमळपणे भेटले. रणबीरला पाहून बॉबी खूप उत्साहित झाला. आल्यानंतर रणबीर थेट बॉबीकडं जाऊन त्याला मिठी मारत असल्याचं दिसत आहे. रणबीर आणि बॉबी देओलमध्ये खूप छान बाँडिंग आहे. याशिवाय रणबीरनं अनेकदा सांगितलं आहे की, तो लहान वयात बॉबीची फॅशन फॉलो करत होता.

'या' कलाकारांनी लावली हजेरी : मुंबई पोलिसांना समर्पित असलेला कार्यक्रम 'उमंग 2023'मध्ये विकी कौशल, जॉन अब्राहम, जितेंद्र, झीनत अमान, कार्तिक आर्यन, नवाजुद्दीन सिद्दीकी, अनु मलिक, अभिजीत भट्टाचार्य, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ, नेहा धुपिया, बाबिल खान, हुमा कुरेशी, अदा शर्मा, अगस्त्य नंदा आणि इतर कलाकारांनी ग्रँड एन्ट्री केली. 'उमंग 2023' कार्यक्रमात रोहित शेट्टी, करण जोहर, रवीना टंडन, माधुरी दीक्षित, शिल्पा शेट्टी, अरबाज खान, रितेश देशमुख आणि जेनेलिया, क्रिती सेनॉन, तमन्ना भाटिया, पूजा हेगडे, अनन्या पांडे, शहनाज गिल, वाणी कपूर, नोरा फतेह, तेजस्वी प्रकाश, जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत सिंग सारख्या स्टार्स त्यांच्या ग्लॅमरस अवतारात दिसले. याशिवाय जान्हवी कपूरनंही तिच्या देसी अवतारानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

हेही वाचा :

  1. प्रभास स्टारर 'सालार' बॉक्स ऑफिसवर घालत आहे धुमाकूळ
  2. शाहरुख खान स्टारर 'डंकी' करणार बॉक्स ऑफिसवर चौथ्या दिवशी 'इतकी' कमाई
  3. अहान शेट्टी आणि तानिया श्रॉफचं 11 वर्षांच्या डेटिंगनंतर झालं ब्रेकअप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.