ETV Bharat / entertainment

TRIAL PERIOD TRAILER RELEASED : ट्रायल पीरियडचा ट्रेलर जिओ सिनेमावर प्रदर्शित... - जेनेलिया देशमुख

जिओ सिनेमाने जेनेलिया देशमुख आणि मानव कौल यांच्या आगामी वेब सीरिजचा एक ट्रेलर शेअर केला आहे. या चित्रपटाची कहाणी फार हटके आहे त्यामुळे बघा हा ट्रेलर...

TRIAL PERIOD TRAILER RELEASED
ट्रायल पीरियडचा ट्रेलर रिलीज
author img

By

Published : Jul 7, 2023, 6:26 PM IST

मुंबई : बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा शेवटची ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या 'वेड' या मराठी चित्रपटात दिसली होती. आता फार दिवसानंतर रूपेरी पडद्यावर ती परत आली आहे. जेनेलिया देशमुख ही ट्रायल पीरियड या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. याशिवाय आता या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या वेब सीरिजमध्ये जेनेलियासोबत मानव कौल देखील असणार आहे. ट्रायल पीरियडचा मजेदार ट्रेलर ७ जुलै रोजी रिलीज झाला आहे. याआधी या वेब सीरिजचा टीझर रिलीज झाला होता. वेब सीरिजचा ट्रेलर पाहिल्यानंतर तुमच्याही मनात अनेक प्रश्न निर्माण होईल, आता हा नवीन ट्रेंड काय आहे आणि ते होऊ शकते का? हा ट्रेलर फार गोंधळात टाकणारा आहे.

ट्रेलर कसा आहे : ट्रेलरची सुरुवात टीव्हीवर सुरू असलेल्या जाहिरातीने होते. त्यानंतर या वेब सीरिजच्या एका दृश्यात शक्ती कपूर, जेनेलिया आणि वेब सीरिजमध्ये साकारत असलेल्या बालकलाकारासोबत संवाद साधताना दिसत आहे. या दृश्यात तो बालकलाकार ट्रायल पिरियड एका वडिलांची मागणी जेनेलिया करतो. त्यानंतर जेनेलिया ट्रायल पिरियडवर वडील मुलाला भेटू शकेल का या गोष्टीचा शोध घेते. त्यानंतर तिला एक एजन्सी चालवणारा व्यक्ती मिळतो हा व्यक्ती त्यांना एक व्यक्त ट्रायल पीरियडवर देतो त्यानंतर मानव कौल एंन्ट्री होते. जेनेलियाच्या घरात वडील म्हणून ट्रायल पीरियडवर मानव कौल प्रवेश करतो, पण हे मूल त्याला फार त्रास देते. मानव कौल हा चित्रपटात बेरोजगार आहे, म्हणून तो ट्रायल पीरियडवर वडील बनून काही पैसे कमविण्याचा प्रयत्न करतो.

चित्रपट कधी प्रदर्शित होणार? : ही वेब सीरिज जिओ स्टुडिओ सादर करत आहे. दरम्यान, ही वेब सीरिज क्रोम पिक्चर्स प्रोडक्शन बॅनरखाली बनवली गेली आहे. आलिया सेनने या वेब सीरिजचे लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. हेमंत भंडारी, अमित रवींद्रनाथ शर्मा आणि आलिया सेन यांनी या वेब सीरिजची निर्मिती केली आहे. या वेब सीरिजच्या निर्मात्यांनी 'बधाई हो' सारखा हाय ऑक्टेन चित्रपटही बनवला आहे. ही वेब सीरिज २१ जुलै रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार असून तुम्ही या वेब सीरिजला विनामूल्य पाहू शकता. हा ट्रेलर बघितल्यानंतर चाहते ही वेब सीरिज बघण्यासाठी फार उत्सुक आहे.

हेही वाचा :

  1. Bawaal : 'बवाल' या चित्रपटामधील पहिले गाणे प्रदर्शित....
  2. Jailer song Kaavaalaa: तमन्ना भाटियासोबत रजनीकांत 'जेलर' चित्रपटाच्या डान्स फ्लोअरवर...
  3. Adipurush Box Office Collection Day 21: 'आदिपुरुष' चित्रपट लवकरच जाणार पडद्याआड...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.