ETV Bharat / entertainment

Maharashtra Shaheer trailer : शाहीर साबळेंच्या करारी आयुष्याची गाथा, महाराष्ट्र शाहीरचा ट्रेलर रिलीज - Maharashtra Shaheer trailer

शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. अजय अतुलच्या बहारदार संगीतासह शाहीरांच्या करारी आयुष्याची गाथा पडद्यावर साकारणार असल्याची खात्री ट्रेलर आपल्याला देतो.

Maharashtra Shaheer trailer
महाराष्ट्र शाहीरचा ट्रेलर रिलीज
author img

By

Published : Apr 12, 2023, 3:13 PM IST

मुंबई - शाहीर साबळे यांची जीवनगाथा पुन्हा एकदा महाराष्ट्रात नवचैतन्य निर्माण करणार आहे. महाराष्ट्र शाहीर या साबळेंच्या जीवनावरील चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा भव्य ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. दमदार संवाद, रंजक सत्यकथा, शाहीरी कवने आणि श्रवणीय संगीत असलेला हा ट्रेलर शाहीर साबळेंचे जीवनकार्य समजून घेण्यासाठी उत्कंठा वाढवणारा आहे.

स्वातंत्र्य चळवळीतील शाहीरांचे योगदान - शाहीर साबळे यांना लहानपणापासूनच गायनाची आवड होती. सातारा जिल्ह्यातील पसरणी या छोट्या खेड्यात जन्मलेले शाहीर यांचे गायन सर्वांनाच आवडायचे. परंतु गाण्यामुळे पोट भरत नाही, हे आपले काम नाही अशी समज त्यांच्या आई आणि आजीची होती. गाण्याच्या नादात मुलगा शिकत नाही म्हणून आईने त्यांना अंमळनेरला आजीकडे शिकायला पाठवले. पण तिथेही त्यांनी गाण्याचा ध्यास सोडला नाही. अंमळनेरला असताना त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. जाणते झाल्यानंतर ते साने गुरुजींच्या समाजिक कार्यतही सक्रिय झाले. याच काळात ते अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या संपर्कात आले आणि ४२ च्या स्वातंत्र्य लढ्यातही सहभागी झाले. पोट भरण्यासाठी त्यांनी मुंबईची वाट धरली आणि स्वातंत्र्यानंतर शाहीर साबळे यांनी गोवामुक्ती संग्राम, हैद्राबाद मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ यात आपल्या पहाडी आवाजाने त्यांनी लोकांना मंत्रमुग्ध केले.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

लोककला जपणारे शाहीर - लोककलांचा आणि लोकगीतांचा संस्कार झालेले शाहीर साबळे मुंबईला आल्यावर या लोककलांना सामाजिक बदलाची जोड देऊन गाऊ लागले. अभंग, वाघ्या-मुरळी, बाल्या नाच, भारूड, कोळीगीते शेतकरी नृत्य, लावणी, जोगवा अशा लोककलांसाठी त्यांनी 'महाराष्ष्ट्राची लोकधारा' हा कार्यक्रम लोकप्रिय बनवला. या दरम्यान त्यांची पत्नी भानुमती यांनी मोलाची साथ दिली. त्या उत्तम कविता करत असत आणि शाहीर साबळे त्यांना चाली लावून लोकजागर करत. शाहीर साबळेंचे असे दैदिप्यमान जीवन त्यांचा नातू केदार शिंदे यांनी रुपेरी पडद्यावर मांडले आहे.

दिग्गजांचा सहवास लाभलेले शाहीर - या चित्रपटात बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, साने गुरूजी, लता मंगेशकर अशा अनेकांची झलक आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्व प्रकारच्या लोक संगीताचा, गाण्ंयाचा उत्तम मेळ यात पाहायला मिळणार आहे. अजय अतुलच्या संगीताने शाहिरांच्या जुन्या कवनांना, लोकगीतांना पुन्हा नवा बहर आला आहे.

‘महाराष्ट्र शाहीर' रिलीज तारीख - सध्या शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष सुरू आहे. या दरम्यान त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित चित्रपट ‘महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट रिलीज होत आहे. या चित्रपटाची सुंदर आणि रंजक कथा प्रतिमा कुलकर्णी यांनी लिहिली असून शाहीर साबळेंच्या या चरित्रपटामध्ये अंकुश चौधरीने शाहीरांची भूमिका साकारली आहे. १८ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट महाराष्ट्रासह देशभरातील अनेक शहरात रिलीज होणार आहे.

हेही वाचा - Suhana Khan Sparks Nepotism Debate : सुहाना खान बनली मेबेलाइनची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर, नेपोटिझमच्या चर्चेला उधाण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.