मुंबई - रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. 'प्यार का पंचनामा' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटांचे दिग्दर्शक लव रंजन आगामी रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरसोबत एक शीर्षकहीन चित्रपट करत होते. त्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख खूप आधी जाहीर केली आहे. या चित्रपटाचे शूटिंग बऱ्याच दिवसांपासून सुरू असून शूटिंग सेटवर कधी फोटो तर कधी व्हिडिओ व्हायरल होत आहेत. 13 डिसेंबर रोजी, श्रद्धा कपूरने पोस्टर शेअर करून चित्रपटाचे नाव पूर्णपणे उघड केले नाही. मात्र आता या चित्रपटाचे नाव समोर आले आहे.
श्रद्धा कपूरने केले वचन पूर्ण - तिने चाहत्यांना दिलेल्या वचनानुसार 14 डिसेंबरला श्रद्धा कपूरने चित्रपटाच्या नावाची घोषणा केली आहे. चित्रपटाचे नाव आहे 'तू झुठी... मैं मक्कार'. चित्रपटाचा एक टीझरही रिलीज करण्यात आला आहे, ज्यामध्ये रणबीर आणि श्रद्धाची जोडी अप्रतिम दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
कधी प्रदर्शित होणार चित्रपट - चित्रपटाच्या नावासोबतच चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. हा चित्रपट 8 मार्च 2023 रोजी होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
चाहत्यांची प्रतीक्षा संपली - यापूर्वी श्रद्धा कपूरने 13 डिसेंबर (मंगळवार) रोजी सोशल मीडियावर एक पोस्टर रिलीज केले होते. या पोस्टरमध्ये चित्रपटाच्या नावाची पहिली अक्षरे लिहिली होती व अभिनेत्रीने चित्रपटाचे नाव सांगण्यास सांगितले होते. या चित्रपटाचे नाव उद्या (१४ डिसेंबर) समोर येणार असल्याचे श्रद्धाने सांगितले होते.
शूटचे व्हिडिओ झाले व्हायरल - रणबीर आणि श्रद्धा पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसत आहेत. याआधी चित्रपटाच्या शूटच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर पाण्यात शूटिंग करताना दिसले होते. येथे एक रोमँटिक सीन शूट करण्यात आला, ज्यामध्ये रणबीर कपूर शर्टलेस दिसत होता. शूटिंगचे हे ठिकाण स्पेन असल्याचे सांगण्यात आले.
याआधी, नुकताच आणखी एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये कोरिओग्राफर रणबीर आणि श्रद्धाला रोमँटिक सीनवर स्टेप्स शिकवत होते. या चित्रपटाच्या घोषणेसोबतच हा चित्रपट ८ मार्च २०२३ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले. आता चित्रपटातील एका गाण्याच्या शूटींगमधून रणबीर-श्रद्धाचा डान्स व्हिडिओ लीक झाला आहे.
रणबीर आणि श्रद्धा कपूर यांनी लव रंजनच्या या शीर्षक नसलेल्या चित्रपटाचे शूटिंग आधीच सुरू केले होते, परंतु कोविड-19 मुळे चित्रपट अडकला. लव रंजनचे चित्रपट पूर्ण मनोरंजन करण्यासाठी ओळखले जातात. लव रंजनच्या चित्रपटांचे तरुणांमध्ये खूप कौतुक होत आहे. लव रंजनने 'प्यार का पंचनामा' आणि 'प्यार का पंचनामा-2' सारख्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे.
लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित आणि भूषण कुमार प्रस्तुत या चित्रपटात रणबीर आणि श्रद्धा सोबत डिंपल कपाडिया आणि बोनी कपूर देखील दिसणार आहेत.
हेही वाचा - Hemant Birje : 'टारझन' फेम हेमंत बिर्जे म्हणतोय, 'नायक नहीं खलनायक हूं मैं...'!