मुंबई - Tiger Shroff joins Singham Again : अभिनेता टायगर श्रॉफ 'सिंघम अगेन' या रोहित शेट्टीच्या आगामी महत्त्वकांक्षी चित्रपटाच्या स्टार कास्टमध्ये सामील झालाय. रोहित शेट्टीनं इनस्टाग्रामवर एक पोस्ट लिहून ही माहिती चाहत्यांना कळवलीय. त्यानं लिहिलंय, 'स्पेशल टास्क फोर्सचा अधिकारी एसीपी सत्याला भेटा...सत्यासारखाच अमर. टायगर, तुझं सहर्ष स्वागत आहे.'
रोहितनं टायगरचा 'सिंघम अगेन' या ॲक्शन पॅक्ड चित्रपटातील लूकही शेअर केलाय. यात टायगर आपल्या बलदंड शरीरयष्टीसह आकर्षक दिसतोय. 'सिंघम अगेन' या आगामी चित्रपटात अजय देवगण, दीपिका पदुकोण, करीना कपूर खान, अक्षय कुमार आणि रणवीर सिंग यांच्याही भूमिका आहेत.
'सिंघम अगेन' चित्रपटाच्या परिवारातील इतर सदस्यांकडूनही टायगरचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. अक्षय कुमारनं लिहिलय, 'माझ्या भावाचं स्वागत करत आहे, एसीपी सत्या म्हणून या पथकात टायगर तुझं स्वागतआहे', अशा आशयाची पोस्ट त्यानं लिहिलीय. अजय देवगणनंही त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे. 'आमची टीम आता मजबूत झालीय. एसीपी सत्या तुझं टीममध्ये स्वागत आहे.', असं अजयनं लिहिलंय. रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटात टायगर श्रॉफ सामील झाल्याचा आनंद त्याच्या चाहत्यांनाही झालाय. या नव्या अपडेटमुळे त्यांच्यात उत्साह संचारला आहे.
'सिंघम अगेन' हा चित्रपट 2024 च्या स्वातंत्र्यदिनी थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर अल्लु अर्जुन स्टारर 'पुष्पा 2' सोबत होणार आहे.
'सिंघम' हा चित्रपट 2011 मध्ये रिलीज झाला होता. यामध्ये अभिनेत्री काजल अग्रवाल, सचिन खेडेकर आणि प्रकाश राज यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यानंतर 2014 मध्ये 'सिंघम रिटर्न्स' प्रदर्शित झाला. दोन्ही प्रोजेक्ट बॉक्स ऑफिसवर हिट झाले झाले होते. दरम्यान, टायगर श्रॉफ त्याचा आगामी 'गणपथ- अ हिरो इज बॉर्न' चित्रपटाच्या रिलीजसाठी सज्ज झालाय. कृती सेनॉन आणि अमिताभ बच्चन यांच्याही भूमिका असलेला हा चित्रपट या शुक्रवारी २० ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केलंय.
हेही वाचा -
३. Mehreen Pirzada : वैवाहिक बलात्कारच्या सीनमुळे मेहरीन पिरजादा ट्रोल; दिलं सडेतोड उत्तर...