ETV Bharat / entertainment

Tiger shroff and janhvi kapoor : टायगर श्रॉफ आणि जान्हवी कपूर झळकणार दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या आगामी 'रेम्बो' चित्रपटात... - सिद्धार्थ आनंद

Tiger shroff and janhvi kapoor : टायगर श्रॉफ आणि जान्हवी कपूर हे लवकरच एकत्र 'रेम्बो'मध्ये दिसणार आहेत. हा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदचा अ‍ॅक्शन चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये चाहत्यांना टायगरची अ‍ॅक्शन पुन्हा पाहायला मिळणार आहे.

Tiger shroff and janhvi kapoor
टायगर श्रॉफ आणि जान्हवी कपूर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2023, 7:47 PM IST

मुंबई Tiger shroff and janhvi kapoor : टायगर श्रॉफला बॉलिवूड इंडस्ट्रीत अ‍ॅक्शन किंग म्हणून ओळखलं जातं. टायगर अनेक चित्रपटांमध्ये अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसला आहे. टायगर श्रॉफच्या आगामी चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. 'पठाण' चित्रपट दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या अ‍ॅक्शन चित्रपट 'रेम्बो'मध्ये टायगर दिसणार असल्याचं समजत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात त्याच्यासोबत जान्हवी कपूर देखील असणार आहे. 'वॉर'च्या यशानंतर सिद्धार्थ आनंद टायगर श्रॉफसोबत ब्लॉकबस्टर अ‍ॅक्शन फिल्म बनवण्याचा विचार करत असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती.

हॉलिवूड चित्रपट 'रॅम्बो'चा हिंदी रिमेक : हा अ‍ॅक्शन चित्रपट हॉलिवूड सुपरस्टार सिल्वेस्टर स्टॅलोनच्या प्रसिद्ध फ्रेंचाइजी 'रॅम्बो'चा हिंदी रिमेक असणार आहेत. सिद्धार्थ आणि त्याची टीम दिग्दर्शक रोहित धवनसोबत या चित्रपटाची जोरदार तयारी करत आहे. 'रेम्बो'चं शूटिंग पुढील वर्षी जानेवारी महिन्यात सुरू केलं जाऊ शकतं. टायगर हा पहिल्यांदा जान्हवीसोबत रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग ही युरोपमध्ये होणार आहे. टायगर या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत असून त्याच्या फिटनेसकडे तो जास्त लक्ष देत आहे. 'रेम्बो' चित्रपटामध्ये टायगर हा धोकादायक अ‍ॅक्शन आणि स्टंट करताना दिसणार आहे.

टायगर श्रॉफ आणि जान्हवी कपूरचा वर्क फ्रंट : टायगर श्रॉफच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तो अक्षय कुमारसोबत दिग्दर्शक अली अब्बास जफरच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटात दिसणार आहे. यानंतर टायगर तो क्रिती सेननसोबत 'गणपत' या चित्रपटात झळकणार आहे. तसंच जर, जान्हवी कपूरच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झाले तर, ती साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरच्या 'एनटीआर 30' मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांना पुढच्या वर्षापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. या चित्रपटाद्वारे जान्हवी ही साऊथ चित्रपटसृष्टीत पदार्पण करेल. तिचा 'एनटीआर 30' हा चित्रपट पुढील वर्षी 5 एप्रिल 2024 रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.

हेही वाचा :

  1. Satinder Kumar Khosla Death : बिरबल हरपला, ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतींदर कुमार खोसला काळाच्या पडद्याआड
  2. Mahima Chaudhary Birthday : महिमा चौधरीनं 'या' चित्रपटापासून केलं होतं बॉलिवूडमध्ये पदार्पण...
  3. G20 summit : जी20 शिखर परिषदेसाठी बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.