मुंबई - शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्यानंतर बॉलिवूडमधील आणखी एका जोडप्याच्या ब्रेकअपची बातमी येत आहे. ही जोडी दुसरी कोणी नसून बॉलिवूडचे पॉवरफुल कपल टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी आहे. टायगर-दिशाच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी बॉलिवूडमध्ये जोर धरला आहे. तथापि, या जोडप्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही किंवा या जोडप्याने कधीही सार्वजनिकपणे त्यांच्या नात्याची कबुली दिली नव्हती.
काही काळापूर्वी या दोघांच्या आउटिंग आणि व्हेकेशनच्या फोटोंवरून अनेक संकेत मिळत होते. मात्र या वर्षाच्या सुरुवातीपासूनच या जोडप्याचे स्टेटस अविवाहित असल्याचे बोलले जात आहे. मीडियानुसार, दिशा आणि टायगरचे मार्ग आता वेगळे झाले आहेत. दोघांनीही आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब न करताच थांबण्याचा निर्णय घेतला आहे.
मीडियानुसार, टायगरच्या एका मित्राने या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. टायगरच्या मित्राने सांगितले की, त्यालाही काही काळापूर्वी याची माहिती मिळाली आहे आणि ब्रेकअपचा अभिनेतावर कोणताही परिणाम झाला नाही आणि तो त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे.
टायगरच्या मित्राचे म्हणणे आहे की, टायगरने याबाबत अद्याप कोणालाही सांगितले नाही. पण याच दरम्यान टायगर-दिशा एकमेकांच्या पोस्ट लाइक करत आहेत आणि आगामी चित्रपटांसाठी एकमेकांना शुभेच्छाही देत असल्याची बातमी आहे.
दिशाचा आगामी चित्रपट 'एक व्हिलन रिटर्न्स' 29 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे, तर टायगरच्या आगामी 'स्क्रू ढीला' या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे. दोघे अजूनही चांगले मित्र असल्याचं बोललं जात आहे. तथापि, हा ट्रेंड देखील नवीन नाही की जेव्हा एखाद्या अभिनेत्याचा किंवा अभिनेत्रीचा चित्रपट प्रदर्शित होणार असतो तेव्हा त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या अनेकदा मथळे बनतात. आता या बातमीवर ही जोडी कोणती प्रतिक्रिया देते याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.
हेही वाचा - 'इमर्जन्सी' चित्रपटातील श्रेयस तळपदेचा 'अटल बिहारी वाजपेयी' फर्स्ट लूक