ETV Bharat / entertainment

Tiger 3: सलमान खान-कतरिना कैफ स्टारर 'टायगर 3'चे प्रमोशनल कॅम्पेन होईल सुरू... - प्रमोशनल कॅम्पेन

Tiger 3: सलमान खान स्टारर 'टायगर 3' च्या रिलीजच्या पार्श्वभूमीवर लवकरच एक संदेश प्रदर्शित होणार आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट दिवाळीला रिलीज होईल.

Tiger 3
टायगर 3
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2023, 4:30 PM IST

Updated : Sep 25, 2023, 5:03 PM IST

मुंबई - Tiger 3: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या आगामी 'टायगर-3'ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट अंदाजे 300 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला आहे. 'टायगर-3' चित्रपट 10 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत आहेत आणि आता ही प्रतीक्षा संपणार आहे, मिळालेल्या माहितीनुसार 'टायगर-3'च्या ट्रेलर बाबात एक संदेश 27 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. हा यशराज फिल्म्स स्पाय युनिव्हर्सचा पाचवा चित्रपट आहे. 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है', 'वॉर' आणि 'पठाण' हे चित्रपट रूपेरी पडद्यावर खूप लोकप्रिय झाले आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'टायगर-3' चित्रपटाचा टिझर होणार रिलीज : 'टायगर-3' या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. तसेच प्रेक्षकांना ट्रेलर व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्यांदाच 'टायगर-3'ची झलक पाहायला मिळणार आहे. 'टायगर-3'च्या चित्रपटाचे काही पोस्टर्स यापूर्वी प्रदर्शित झाले होते. 'टायगर-3' चित्रपटामधील पोस्टर्स चाहत्यांना खूप आवडले होते. याशिवाय चित्रपटाचे प्रमोशन हे ट्रेलरद्वारे करण्यात येणार आहे. 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' नंतर 'टायगर 3' हा सलमानचा तिसरा स्पाय थ्रिलर चित्रपट असेल. या चित्रपटात सलमान आणि कतरिना सहा वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर टायगर आणि झोयाच्या भूमिकेत परतत आहेत. या चित्रपटात इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'टायगर-3'च्या दिग्दर्शनाची जबाबदारी मनीष शर्मा यांनी घेतली आहे.

सलमान आणि किंग खान दिसणार एकत्र : 'टायगर 3' चित्रपटाद्वारे सलमान खान एक महत्त्वाचा संदेश देणार आहे. यासोबतच करण-अर्जुन म्हणजेच शाहरुख आणि सलमानची जोडीही पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. याआधी सलमान किंग खानच्या 'पठाण' चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसला होता. आता किंग खान भाईजानच्या चित्रपटात छोटी भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वीच 'टायगर 3'चे पहिले पोस्टर रिलीज झाले होते, ज्यामध्ये सलमान आणि कतरिनाची जबरदस्त स्टाइल आणि अ‍ॅक्शन पाहायला मिळाली होती. मोस्ट अवेटेड 'टायगर 3' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. 'टायगर 3' चित्रपटाची वाट चाहते आतुरतेने पाहत आहेत.

हेही वाचा :

  1. Jawan box office collection day 19 : शाहरुख खानचा 'जवान' लवकरच जागतिक स्तरावर 1000 कोटींचा टप्पा ओलांडेल...
  2. RagNeeti first pictures from wedding : परिणीती चोप्रा-राघव चढ्ढा यांचे लग्नातील सुंदर फोटो, नवविवाहितांवर खिळल्या नजरा
  3. Parineeti and Raghav look perfect : परफेक्ट पती पत्नी परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढाचे लग्नानंतरचे आकर्षक फोटो

Last Updated : Sep 25, 2023, 5:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.