मुंबई - Tiger 3 Collection Day 1 Prediction: 'टायगर 3' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर 'टायगर' फ्रेंचायझी बॉलिवूडमधील सर्वात मोठी फ्रेंचायझी आहे. 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है'च्या जबरदस्त यशानंतर, चाहते त्याच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'टायगर 3' या चित्रपटात सलमान आणि कतरिना टायगर आणि झोयाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय या चित्रपटामध्ये इमरान हाश्मी यात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट दिवाळीच्या मुहुर्तावर 12 नोव्हेंबर रोजी रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. या चित्रपटामध्ये सलमान आणि कतरिना अॅक्शनमोडमध्ये दिसणार आहे.
'टायगर 3' पहिल्या दिवशी किती कमाई करेल? : 'टायगर 3' हा वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे. सलमान आणि इमरानला मोठ्या पडद्यावर समोरासमोर पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. 'टायगर 3' पहिल्या दिवशीच 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनिष शर्मा यांनी केले आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये रिलीज होणार आहे. बॉक्स ऑफिसवर 'टायगर 3' चित्रपट प्रचंड कमाई करेल असं सध्या दिसत आहे, कारण सलमान आणि कॅटचे चाहते सोशल मीडियावर या चित्रपटाबाबत व्हिडिओ शेअर करत असतात. या चित्रपटामध्ये शाहरुख खान हा कॅमियोमध्ये दिसणार आहे.
आगाऊ बुकिंगमध्येही मोडेल विक्रम : 'टायगर 3' बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्या 'जवान' आणि 'पठाण'ला मागे टाकत चांगली कामगिरी करेल असा अंदाज बांधला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार असेही बोललं जातंय की, 'टायगर 3' बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा गल्ला सहज गाठू शकतो. मात्र, दिवाळीच्या निमित्तानं हा अंदाज खरा ठरतो की नाही हे पाहणं लक्षणीय ठरणार आहे. दुसरीकडे, व्यापार विश्लेषकांच्या मते, 'टायगर 3'चे आगाऊ बुकिंग 5 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. आगाऊ बुकिंगमध्ये 'टायगर 3' 'जवान' आणि 'पठाण'ला चांगलीच टक्कर देताना दिसेल.
हेही वाचा :
- Ali Mercchant Got married : अभिनेता अली मर्चंटनं मॉडेल अंदलीब जैदीशी केलं लग्न; फोटो व्हायरल
- Sara ali khan and Ananya panday: सारा अली खान आणि अनन्या पांडे 'कॉफी विथ करण'च्या 8व्या सीझनमध्ये झळकणार
- What is a rave party : ड्रग तस्करीत फसला एल्विश यादव, काय असते रेव्ह पार्टी आणि कसं सुरू झालं रेव्ह कल्चर?