ETV Bharat / entertainment

विजय देवराकोंडाचा जबरदस्त बहुप्रतीक्षित 'लायगर'चा ट्रेलर अखेर रिलीज - Ligar

विजय देवराकोंडाचा ( Vijay Devarakonda ) बहुप्रतीक्षित 'लायगर' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर अखेर रिलीज करण्यात आला आहे. बॉक्सरच्या भूमिकेत असलेल्या विजयचे आक्रमक रुप यात पाहायला मिळत आहे. हा चित्रपट 25 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार आहे.

'लायगर'चा ट्रेलर अखेर रिलीज
'लायगर'चा ट्रेलर अखेर रिलीज
author img

By

Published : Jul 21, 2022, 9:40 AM IST

Updated : Jul 21, 2022, 10:00 AM IST

मुंबई - अभिनेता विजय देवराकोंडाचा ( Vijay Devarakonda )बहुप्रतीक्षित लायगर चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. आक्रमक भूमिकेत असलेला विजय भारतीय बॉक्सरची व्यक्तीरेखा साकारताना दिसतो. अंगावर शहारे आणणारे सीन्स, डोळे दिपवणारे अॅक्शन स्टंट्स, जबरदस्त रोमान्स आणि बॉक्सिंगच्या रिंगमधील दिलखेचक थ्रिल ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

विजय देवरकोंडा बॉलिवूड पदार्पण - विजय देवरकोंडा 'लायगर'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्याचबरोबर या चित्रपटाद्वारे अनन्या पांडे तेलगू चित्रपटांमध्ये पदार्पण करत आहे, तसेच हा पहिला भारतीय चित्रपट आहे ज्यामध्ये माइक टायसन कॅमिओमध्ये दिसणार आहे. विजय देवरकोंडा 'लाइगर' मध्ये बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. पुरी जगन्नाध, चार्मे कौर, करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

लायगर हा चित्रपट 25 ऑगस्ट 2022 रोजी हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - Actress Amisha Patel : अभिनेत्री अमीषा पटेल विरोधात अटक वॉरंट जाहीर; 11 लाख रुपये घेऊन लग्नात राहिली नव्हती हजर

Last Updated : Jul 21, 2022, 10:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.