ETV Bharat / entertainment

Baloch trailer : गुलामगिरी पत्करूनही हार न मानणाऱ्या योद्ध्याची कहाणी... 'बलोच' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च - बलोचचे कास्ट आणि क्रू

बलोच या चित्रपटातून मराठा सैन्याची एक अज्ञात कथा मांडण्यात आली आहे. बलुचिस्तानात पराभवानंतर गुलामगिरीत ढकलेल्या मराठा सैनिकांची परिस्थितीशी झुंज यात पाहायला मिळणार आहे. बलोच या चित्रपटाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

'बलोच' ट्रेलर झाले अनावरित
'बलोच' ट्रेलर झाले अनावरित
author img

By

Published : Apr 26, 2023, 11:18 AM IST

मुंबई - शाळेत प्रत्येकजण इतिहास शिकलेला असतो. त्यात खासकरून मराठ्यांच्या लढाया आणि पराक्रम उर भरून आणतात. परंतु आपल्या मावळ्यांनी प्रत्येक लढाई जिंकली असे नाही. काही लढायांत त्यांना हार देखील पत्करावी लागली होती. परंतु त्या हरण्याने कोलमडून न जाता ते जिद्दीने पुन्हा उभे राहिले. लढायामध्ये मर्दुमकी दाखवत पुन्हा विजय प्राप्त केला आहे. ऐतिहासिक चित्रपट आपले ज्ञान वाढवितात आणि इतिहासात नेमके काय घडले असेल याची जाणीव करून देतात. आता बलुचिस्तानच्या लढाईचे उदाहरण घ्या. या लढाईत मराठ्यांना हार पत्करावी लागली होती. त्यामुळे त्यांना गुलामगिरीही सहन करावी लागली होती. परंतु लाचारी आणि गुलामी मराठ्यांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि धमन्यांमधून वाहणारे सळसळते रक्त शांत बसू देत नव्हते.

बलोच चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च - मराठ्यांना बलुचिस्तानात झालेल्या लढाईत पराभव पत्करावा लागला होता. परंतु हार मानतील ते मराठे कसले? त्यांनी आपल्या पराभवाचा बदला घेतलाच. बलुचिस्तानातील हालअपेष्टा सहन न झाल्यामुळे त्यांनी त्यावर मात करून पुन्हा एकदा विजय प्राप्त करीत भगवा झेंडा अटकेपार रोवला. याच लढाईवर आधारित एक मराठी सिनेमा येऊ घातलाय ज्याचं नाव आहे 'बलोच'. नुकतेच या चित्रपटाचे ट्रेलर रंगारंग कार्यक्रमात अनावरीत करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांचे स्वागत राजेशाही थाटात करण्यात आले तसेच रांगोळी, तुतारी, ढोल ताशे हेदेखील कार्यक्रमचं मराठमोळंपण वृद्धिंगत करीत होते.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

जबरदस्त ऐतिहासिक कथानक - बलोच ही गुलामगिरी पत्करूनही ज्याने हार मानली नाही अशा एका मराठी लढवय्याची कहाणी आहे. तसेच या चित्रपटातील 'खुळ्या जिवाला आस खुळी' या गाण्यातून त्याचे निरागस प्रेम सुद्धा दिसून येते. या चित्रपटातील रोमांचकारी लढाया चित्रपटाची शोभा वाढविते तर नवरा बायकोमधील हळुवार प्रेम मनाला भावते. या चित्रपटाची अजून एक खासियत म्हणजे यातील संवाद. दमदार संवाद प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतील आणि भव्य युद्धप्रसंग अंगावर शहारे आणतील. या चित्रपटात एका बाजूला निरागस प्रेम दिसेल तर दुसरीकडे बलुचिस्तानमधील प्रखर युद्ध अनुभवायला मिळेल असे दिग्दर्शक सांगतात.

बलोचचे कास्ट आणि क्रू - प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून कथा आणि पटकथाही त्यांचीच आहे. या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे अमेय विनोद खोपकर, विश्वगुंज पिक्चर्स, कीर्ती वराडकर फिल्म्स आणि अमोल कागणे स्टुडिओज यांनी. निर्मितीची धुरा वाहिली आहे महेश करवंदे (निकम), जीवन जाधव, गणेश शिंदे, दत्ता काळे (डी. के.), जितेश मोरे, संतोष बळी भोंगळे, नेमाराम चौधरी, बबलू झेंडे, गणेश खरपुडे, ज्ञानेश गायकवाड यांनी तर पल्लवी विठ्ठल बंडगर, सुधीर वाघोले, विजय अल्दार यांची सहनिर्मिती आहे. बलोच मध्ये प्रवीण तरडे, अशोक समर्थ, स्मिता गोंदकर, रमेश परदेशी, अमोल कागणे, सुरभी भोसले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

प्रवीण तरडेचा जबरदस्त अभिनय - या चित्रपटाविषयी सांगताना दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणाले, 'मराठ्यांना हार कधी मान्य नव्हती त्यामुळे जेव्हा पानिपतच्या लढाईत त्याच्या आयुष्यात पराभव आला तेव्हा त्यांना नैराश्य आले. त्यांना चक्क गुलामगिरी पत्करावी लागली. त्या नैराश्यावरा मात करीत पुन्हा एकदा अत्याचाराच्या विरोधात उभे राहत मराठ्यांनी आपली गुलामगिरीतून सुटका करून घेतली. याच शौर्याला सलाम करणारा चित्रपट म्हणजे बलोच. यात पराभव आहे परंतु त्यावर मात करणारी विजयगाथा सुद्धा आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरून चित्रपटाच्या भव्यतेची कल्पना आलीच असेल. तसेच प्रवीण तरडे यांच्या निवडीबद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटातील लढवय्या मराठ्यासाठी त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय शोधूनही सापडला नसता. फिल्मास्त्र स्टुडिओजच्या अमेय खोपकर, अमोल कागणे, प्रणित वायकर यांनी 'बलोच’च्या वितरणाची धुरा सांभाळली असून हा चित्रपट येत्या ५ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा - Kannada Actor Sampath J Ram : कन्नड अभिनेता संपत जे राम याने केली आत्महत्या; राजेश ध्रुवाने केला धक्कादायक खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.