ETV Bharat / entertainment

Release date of Ganpat 1 : बिग बीसह टायगर आणि क्रिती सेनॉनच्या 'गणपत १' या तारखेला होणार रिलीज - गणपत या चित्रपटाच्या अ‍ॅक्शनसाठी टायगर

गणपत या अ‍ॅक्शन पॅक्ड चित्रपटाची प्रतीक्षा बऱ्याच काळापासून प्रेक्षक करत आहेत. अखेर या चित्रपटाच्या रिलीज तारखेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तरण आदर्श यांनी ट्विट करत गणपतच्या नवीन रिलीजची तारीख सांगितली.

release date of Tiger and Kriti Sanon's 'Ganpat 1'

author img

By

Published : Feb 22, 2023, 5:24 PM IST

मुंबई - अमिताभ बच्चन, टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन याची मुख्य भूमिका असलेल्या ‘गणपत’ या अ‍ॅक्शन पॅक्ड चित्रपटाची प्रतीक्षा बऱ्याच काळापासून प्रेक्षक करत आहेत. अखेर या चित्रपटाच्या रिलीज तारखेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तरण आदर्श यांनी ट्विट करत गणपतच्या नवीन रिलीजची तारीख सांगितली. त्यांनी लिहिलंय, 'अमिताभ बच्चन, टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन याची मुख्य भूमिका असलेल्या ‘गणपत’ नवीन रिलीजची तारीख ठरली आहे. हा चित्रपट 5 भाषांमध्ये रिलीज होईल. गणपथ भाग 1 हा चित्रपट २० ऑक्टोबर २०२३ रोजी रिलीज होणार आहे.'

टायगर श्रॉफच्या ‘गणपत’ या चित्रपटाची नायिका कोण असणार याबद्दल लोकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. निर्मात्यांनी यापूर्वीच यावरील पडदा दूर करत क्रिती सेनॉनचे नाव घोषीत केले होते. गणपतमध्ये ती जस्सी ही व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहे. खरंतर टायगर आणि कृती यांनी आपल्या कारकीर्दीला २०१४ मध्ये 'हिरोपंथी' या चित्रपटापासून एकत्रितपणे काम करण्यास सुरुवात केली होती. दिग्दर्शक विकास बहलच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी एकत्र काम केले आणि यशाचे शिखर गाठले होते. गणपतचे निर्माते जॅकी भगनानी यांनीच हिरोपंथीची निर्मिती केली होती. या चित्रपटाने अॅक्शन चित्रपटाची एक नवी ओळख बॉलिवूडला करुन दिली होती.

गणपत या चित्रपटातील टायगर श्रॉफची भूमिका 'न भूतो न भविष्यति' अशी असल्याचे दिग्दर्शक विकास बहल यांनी यापूर्वी सांगितले होते. आजवर टायगरने साकारलेल्या सर्व भूमिकांपेक्षा या चित्रपटातील त्याची व्यक्तीरेखा नाविन्यपूर्ण असल्याचे खात्री बहल यांनी दिली होती. गणपत या चित्रपटाचे अनेक भाग बनणार असून पहिला भाग यंदाच्या दसऱ्याच्या दरम्यान प्रेक्षकांच्या भेटीस आणला जाईल.

गणपत या चित्रपटाच्या अ‍ॅक्शनसाठी टायगर श्रॉफही खूप मदत करत आहे. काही महिन्यापूर्वी टायगरला सीन शुट करताना दुखापतही झाली होती. यानंतर निर्मात्यांह त्याचे चाहतेही काळजीत पडले होते. टायगरनेही सोशल मीडियावरुन आपण जखमी असलो तरी ठीक असल्याचे कळवल्यानंतर चाहत्यांचा जीव भांड्यात पडला होता.

टायगर सध्या त्याचा अ‍ॅक्शन चित्रपट गणपत: भाग 1 च्या शुटिंगमध्ये पूर्ण गुंतला आहे. यासाठी तो रात्रंदिवस मेहनत करत आहे व स्वतःला तंदुरुस्त ठेवत आहे. खरंतर टायगर अलीकडेच साजिद नाडियादवाला यांच्या हिरोपंती 2 मध्ये पुन्हा दिसला होता. मात्र, तो बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांना खेचून आणण्यात अपयशी ठरला होता. आता तो क्रिती सॅननसोबत गणपत: भाग १ मध्ये त्याची पुन्हा एकदा परीक्षा होणार आहे. हे परीक्षा त्याच्या आगामी कारकिर्दीसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. अलिकडे पठाण या चित्रपटाने अ‍ॅक्शन मुव्हीकडे प्रेक्षकांना खेचण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे टायगरलाही चांगली संधी असू शकते.

हेही वाचा - रांगड्या भाऊसाहेब शिंदेचा आक्रमक लुक रौंदळच्या ट्रेलरचं मुख्य आकर्षण!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.