ETV Bharat / entertainment

घरमालकाने केली होती घाणेरडी मागणी, तेजस्विनी पंडितचा धक्कादायक खुलासा - निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण

घरमालकाने सेक्शुअल फेवर्स मागितले होते, असा धक्कादायक खुलासा मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री तेजस्विनी पंडितने केला आहे. अथांग या मालिकेच्या प्रमोशन दरम्यान एका पॉडकास्ट मुलाखतीत तिने हा धक्कादायक खुलासा केला आहे.

तेजस्विनी पंडितचा धक्कादायक खुलासा
तेजस्विनी पंडितचा धक्कादायक खुलासा
author img

By

Published : Dec 20, 2022, 3:39 PM IST

मुंबई - चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या अनेक अभिनेत्रींनी प्रसिध्दी मिळाल्यानंतर आपल्या आयुष्यात घडलेल्या अनेक दुर्दैवी घटनांचा अनेकवेळा खुलासा केला आहे. या उद्योगातील अनेक पुरुष सहकारी, निर्माते, दिग्दर्शक यांच्याकडून कास्टिंग काऊचच्या शिकार झाल्याच्या बातम्या अधूनमधून ऐकायला मिळत असतात. असाच एक धक्कादायक खुलासा मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री तेजस्विनी पंडितने केला आहे.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने तिच्यासोबत घडलेल्या एका निराशाजनक घटनेबद्दल सांगितले आहे. ती पुण्यात भाड्याच्या घरात राहात असताना घरमालकाने तिला सेक्शुअल फेवर्स मागितले होते

अभिनेत्रीने सांगितले की, ही घटना 2009-10 मधील आहे. त्यावेळी माझे एक-दोनच चित्रपट प्रदर्शित झाले होते. मी भाड्याने राहत असलेला फ्लॅट एका नगरसेवकाचा होता. जेव्हा मी भाडे भरण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा, घरमालकाने माझ्याकडे सेक्शुअल फेवर्स मागितले होते. मात्र, तिने असे काम करण्यास साफ नकार दिला.

अभिनेत्री ताजस्विनीने सांगितले की, मी त्याचा राग व्यक्त केला आणि सांगितले की, मी हे सर्व करण्यासाठी या व्यवसायात आलेले नाही. याशिवाय तिने टेबलावरील पाण्याचा ग्लास हातात घेतला आणि त्याच्या तोंडावरवर पाणी फेकले. तिने सांगितले की ही गोष्ट ती करत असलेल्या प्रोफेशनमुळे घडली. त्याने माझ्या अभिनयाचा गैरसमज केला, तसेच माझ्याकडे पैसे कमी असल्याने हे सांगण्याचे धाडस केले असावे.

तेजस्विनीने अथांग या वेब सिरीजमधून निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. या मालिकेच्या प्रमोशन दरम्यान एका पॉडकास्ट मुलाखतीत तिने हा धक्कादायक खुलासा केला आहे. पत्रकार सौमित्र पोटे यांच्या मित्रम्हणे या या पॉडकास्ट दरम्यान तिने दुनियादारी या चित्रपटातून तिला का काढले या विषयावरही भाष्य केले. या चित्रपटात सई ताम्हणकरने साकारलेली शिरीन ही व्यक्तीरेखा अगोदर तेजस्विनी पंडित साकारणार होती पंरतु तिला न सांगताच सईचे कास्टिंग झाल्याचेही ती म्हणाली.

हेही वाचा - कुत्तेचा थरारक थ्रिलर देतोय मनोरंजनाची हमी, बहुप्रतीक्षित ट्रेलर रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.