ETV Bharat / entertainment

Sunny Movie : पहिले वहिले मराठी आफ्रिकन गाणे, 'तिरकीट जेम्बे हो' प्रदर्शित! - African song Tirkeet Jembe Ho released

मराठी चित्रपटांतून प्रायोगिकता निथळत असते. इतर कुठल्याही भाषेशी वावडे नसलेल्या मराठी आणि आफ्रिकन भाषेचे संगम असलेले नवीन गाणे सनी चित्रपटाच्या (Sunny Movie) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटायला येणार आहे. नुकतेच ते समाज माध्यमांवर प्रदर्शित करण्यात आले. पहिले वहिले मराठी आफ्रिकन गाणे, 'तिरकीट जेम्बे हो' (Tirkit Jembe Ho) प्रदर्शित झाले आहे.

Sunny Movie
सनी चित्रपट
author img

By

Published : Nov 17, 2022, 6:59 PM IST

मुंबई: मराठी चित्रपटांतून प्रायोगिकता निथळत असते. प्रत्येक भाषेचा आदर करायला मराठी भाषा शिकवत असते. इतर कुठल्याही भाषेशी वावडे नसलेल्या मराठी आणि आफ्रिकन भाषेचे संगम असलेले नवीन गाणे सनी चित्रपटाच्या (Sunny Movie) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटायला येणार आहे. नुकतेच ते समाज माध्यमांवर प्रदर्शित करण्यात आले. पहिले वहिले मराठी आफ्रिकन गाणे, 'तिरकीट जेम्बे हो' (Tirkit Jembe Ho) प्रदर्शित झाले आहे.

सुरुवातीला गोंधळलेल्या, नाराज असणाऱ्या 'सनी'ची हळूहळू डिकॅम्बेबरोबर मैत्री होत आहे. सनी, संतोष आणि डिकॅम्बे यांनी एकत्र येऊन घराचा मेकओव्हर केला असून त्या घराला एक घरपण आणल्याचे दिसते आहे. दोन विभिन्न स्वभाव हळूहळू एकत्र येऊन धमाल करत आहेत. एकंदरच या ढोल ताशाशी ही गिटार कशी जुळतेय, हे या गाण्यात दिसत आहे.

घराचा कायापालट होत असतानाच मैत्रीही बहरवणाऱ्या या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले असून सौमिल - सिद्धार्थ यांचे संगीत लाभले आहे. सिद्धार्थ महादेवन यांनी गायलेले हे गाणे सनी, संतोष आणि डिकॅम्बे म्हणजेच ललित प्रभाकर (Lalit Prabhakar), अभिषेक देशमुख (Abhishek Deshmukh) आणि पाऊलो (Paulo) यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे.

दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) म्हणतात, या गाण्यातून कथा पुढे जात आहे. काहीसा डिकॅम्बेसोबत जुळवून घेताना अवघडलेल्या 'सनी'चे हळूहळू त्याच्यासोबत सूर जुळताना दिसत आहेत. तिघांची मैत्री घट्ट होतानाची प्रक्रिया यात दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट कुटुंबिक आहे, तरुणाईला आवडणारा आहे. त्यामुळे गाणीही प्रत्येक सीनला साजेशी आणि श्रोत्यांना आवडतील, अशीच देण्याचा आमचा प्रयत्न होता. आतापर्यंत आलेल्या गाण्यांना श्रोत्यांनी पसंती दर्शवली आता हे भन्नाट गाणंही संगीतप्रेमींना नक्कीच आवडेल.

ललित प्रभाकर, चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग, अभिषेक देशमुख, अमेय बर्वे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे. तर हेमंत ढोमे यांचे दिग्दर्शन आहे. क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित 'सनी'चे अक्षय बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस, उर्फी काझमी 'सनी'चे निर्माते असून संतोष खेर आणि तेजस्विनी पंडित सहनिर्माते आहेत. येत्या १८ नोव्हेंबर 'सनी' प्रेक्षकांना भेटायला येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.