ETV Bharat / entertainment

कोविड काळातील लगीनघाईची धमाल गोष्ट सांगणारा 'लॉकडाऊन लग्न' ८ मार्चला होणार प्रदर्शित!

Lockdown Lagna released on March 8 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या एका अफलातून लग्नाची गोष्टी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'लॉकडाऊन लग्न' हा नवीन चित्रपट 8 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या लग्नाची मदेशीर लगीनघाई प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Lockdown Lagna released on March 8
'लॉकडाऊन लग्न' ८ मार्चला होणार प्रदर्शित!
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 16, 2024, 5:35 PM IST

मुंबई - Lockdown Lagna released on March 8 : दोन तीन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना महामारीमुळे भारतासकट जगभरात लॉकडाऊन लागलेला होता. सर्वांसाठी तो खूप वेदनादायी आणि तिचकाच नवीन अनुभव होता. त्या सुमारास अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडल्या, परंतु त्यातील काही मजेशीर सुद्धा होत्या. तर, कोरोना काळातील लॉकडाऊनच्या आठवणी ताज्या करणारा एक चित्रपट येऊ घातलाय ज्याचे नाव आहे, 'लॉकडाऊन लग्न'. यात सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे यांची प्रमुख भूमिका असून इतर कलाकारांची नावे अजून उघड करण्यात आलेली नाहीत.

Lockdown Lagna released on March 8
'लॉकडाऊन लग्न' ८ मार्चला होणार प्रदर्शित!

चित्रपटाच्या नावावरून हा सिनेमा विनोदी असेल याची कल्पना येते. 'लॉकडाऊन लग्न' या चित्रपटातून लॉकडाऊनमधील एका लग्नाची मजेशीर गोष्ट सांगण्यात आली आहे. या चित्रपटाचं पोस्टर लाँच नुकतेच सोशल मीडियावर करण्यात आलं आहे. पोस्टरमध्ये मास्क, सँनिटायझर इत्यादी दिसत असून यावरून ही कोरोना काळातली गोष्ट असणार हे अधोरेखित होते. सुमित संघमित्र यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे आणि अमोल कागणे प्रस्तुत 'लॉकडाऊन लग्न' या चित्रपटाची निर्मिती लक्ष्मण कागणे, अमोल कागणे आणि सागर पाठक यांनी केली आहे.

कोरोना कालखंड भीतीदायक वाटत होता आणि सामाजिकदृष्ट्या आव्हानात्मक होता. परंतु त्या काळातही अनेक मजेशीर गोष्टी घडल्या. त्यातीलच एक गोष्ट 'लॉकडाऊन लग्न' मधून सांगत प्रेक्षकांचे मनोरंजन केले जाणार आहे, असे निर्मात्यांचे म्हणणे आहे. कोरोना काळातील गमती जमती आणि त्यावेळी लग्नात कराव्या लागलेल्या करामती यांनी भरलेला 'लॉकडाऊन लग्न' हा चित्रपट असून या चित्रपटातून लग्नाची गोष्ट कशा प्रकारे दाखवली जाणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

फिल्मास्त्र स्टूडिओ 'लॉकडाऊन लग्न' या चित्रपटाचे वितरण संपूर्ण महाराष्ट्रात करणार असून येत्या ८ मार्चला तो प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा -

1. कियारा अडवाणीनं सिद्धार्थ मल्होत्राला वाढदिवसानिमित्त अनोख्या पद्धतीनं दिल्या शुभेच्छा

2. पुरुषोत्तम बेर्डे 'मुक्काम पोस्ट आडगाव'मधून गावरान तडका देण्यासाठी सज्ज

3. प्रियांका चोप्रा आणि निक जोनासने बीचवर मुलगी मालती मेरीचा वाढदिवस केला साजरा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.