ETV Bharat / entertainment

रजनीकांत आणि कमल हसनचं झालं 21 वर्षानंतर पुनर्मिलन - कमल हसन

Rajinikanth and Kamal Haasan : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकार रजनीकांत आणि कमल हसन हे 21 वर्षानंतर हा एका स्टुडिओमध्ये भेटले आहेत. त्यानंतर या कलाकारांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Rajinikanth and Kamal Haasan
रजनीकांत आणि कमल हसन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2023, 5:43 PM IST

मुंबई - Rajinikanth and Kamal Haasan : 'थलैयवा' रजनीकांत आणि 'उलगनायगन' कमल हसन, साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकार आहेत. या दोन्ही साऊथ सुपरस्टार्सची फॅन फॉलोइंग खूप आहे. दोन्ही स्टार्सचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजूनही चांगली कमाई करत आहेत. आता कमल हासन आणि रजनीकांतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे दोन्ही स्टार्स 21 वर्षांनंतर भेटले आहे. हा दुर्मिळ फोटो कुठला आहे. हे दोन सुपरस्टार कसे भेटले? याबद्दल आता सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे. या फोटोमध्ये कमल हासन यांनी काळ्या रंगाची टी-शर्ट आणि पॅन्ट घातला आहे.

21 वर्षांनंतर सुपरस्टार 'हे' इथे भेटले : रजनीकांत यांनी निळ्या रंगाच्या शर्टसह लुंगी परिधान केली आहे. या फोटोमध्ये रजनीकांत यांनी कमल हासन यांना मिठीत पकडले आहे. हा फोटो एका स्टुडिओमधील आहे, जिथे कमल हासन त्यांच्या आगामी देशभक्तीपर चित्रपट 'इंडियन 2'ची शूटिंग करत आहेत आणि योगायोगानं रजनीकांत देखील त्याच स्टुडिओमध्ये त्यांच्या 'थलायवर 170' या चित्रपटाची शूटिंग करत आहेत. आता जेव्हा दोन्ही सुपरस्टार्सची वेळ मॅच झाली, तेव्हा 21 वर्षांनंतर या स्टुडिओमध्ये हे कलाकार पुन्हा एकदा एकत्र आले. 21 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी रजनीकांत आणि कमल हसन लायका प्रॉडक्शन हाऊसमध्ये एकत्र दिसले होते. लायका प्रॉडक्शनने हे फोटो शेअर करून याबद्दलची माहिती दिली आहे.

लायका प्रॉडक्शननं शेअर केला फोटो शेअर : लायका प्रॉडक्शननं आपल्या अधिकृत एक्स हँडल आणि इंस्टाग्राम अकाउंटवर हा अप्रतिम फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दोन्ही सुपरस्टार एकमेकांकडे गोड हावभाव करताना दिसत आहेत. दोघेही सुपरस्टार आनंदाने एकत्र फोटो क्लिक करत आहेत. हा फोटो शेअर करून कॅप्शन मध्ये त्यांनी लिहलं की, 'भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन अतुलनीय दिग्गज, कमल हासन आणि रजनीकांत, एकत्र एक अद्भुत क्षण घालवत आहेत, दोघेही 21 वर्षांनंतर याच स्टुडिओमध्ये दिसत आहेत आणि आम्ही याबद्दल खूप आनंदी आहोत'. रजनीकांत आणि कमल हासन हे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत ते अनेकदा आपल्या चाहत्यांसोबत व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात.

हेही वाचा :

  1. इसरा झाली इसामरा : गायकांच्या हक्क संघटनेत आता संगीतकारांचाही समावेश
  2. 'ड्रामा क्वीन' राखी सावंतनं किंग खानला केलेल्या विचित्र मागणीमुळं झाली ट्रोल
  3. कपिल देवनं पूर्ण केलं 'लाल सलाम'चं डबिंग, रजनीकांतसोबत शेअर करणार रुपेरी पडदा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.