ETV Bharat / entertainment

रेल्वे रुळावर रील बनवणाऱ्या सलमानच्या डुप्लिकेटवर गुन्हा दाखल - सलमान खानचा डुप्लिकेट

सलमान खानचा डुप्लिकेट आझम अन्सारीने रेल्वे ट्रॅकवर रील बनवताना स्वतःसाठी संकटाला आमंत्रित केले आहे. त्याच्या या विचित्र कृत्यासाठी रेल्वे संरक्षण दल लखनौने रेल्वे मार्गावर रील बनवल्याबद्दल एफआयआर नोंदवला आहे. व्हिडिओमध्ये, आझम रेल्वे रुळांवरून चालताना दिसत आहे तर पार्श्वभूमीत सलमानच्या तेरे नाम या चित्रपटाचे शीर्षक गीत वाजत आहे.

लखनौच्या लोकेशन्सवर आझम अन्सारी
लखनौच्या लोकेशन्सवर आझम अन्सारी
author img

By

Published : Aug 24, 2022, 2:33 PM IST

लखनौ - रेल्वे रुळांवर इंस्टाग्राम रील बनवल्याबद्दल रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने ( Railway Protection Force ) लखनऊमध्ये सलमान खानचा डुप्लिकेट ( Salman Khan doppelganger ) आझम अन्सारी ( Azam Ansari ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियासाठी रिल बनवणारा निर्माता आणि सुपरस्टार सलमानचा चाहता आझम अन्सारीने लखनऊमधील रेल्वे ट्रॅकवर त्याच्या इंस्टाग्रामसाठी एक व्हिडिओ शूट केला होता. यामुळे तो अडचणीत सापडला आहे.

व्हिडिओमध्ये आझम अर्धनग्न अवस्थेत दालीगंजमध्ये रेल्वे रुळांवर फिरताना दिसत आहे. तो रुळावर खाली झोपून सिगारेट ओढताना दिसत आहे. सलमानच्या तेरे नाम ( Tere Naam ) या चित्रपटातील तेरे नाम हमने किया है या हिट गाण्यावर ( Tere Naams tile track ) त्याने आपला रील बनवला.

लखनौच्या लोकेशन्सवर आझम अन्सारी
लखनौच्या लोकेशन्सवर आझम अन्सारी

त्याच्या विचित्र कृत्यासाठी आरपीएफ लखनऊने रेल्वे मार्गावर रील बनवल्याबद्दल एफआयआर नोंदवला. आरपीएफनेही या घटनेबाबत ट्विट केले आहे. आरपीएफ लखनऊचे इन्स्पेक्टर सुरेश कुमार यांनी सांगितले की, आरोपींविरुद्ध रेल्वे कायद्याच्या कलम 147, 145 आणि 167 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल.

लखनौच्या लोकेशन्सवर आझम अन्सारी
लखनौच्या लोकेशन्सवर आझम अन्सारी

"रेल्वे कायदा 147 (कोणत्याही व्यक्तीने कायदेशीर अधिकाराशिवाय रेल्वेच्या कोणत्याही भागात किंवा त्यामध्ये प्रवेश केल्यास), 145 (मद्यपान किंवा उपद्रव. -कोणत्याही व्यक्तीने रेल्वेच्या कोणत्याही गाडीत किंवा रेल्वेच्या कोणत्याही भागावर असल्यास) आणि 167 ( ट्रेनमध्ये धुम्रपान करण्यास मनाई) कलमा अंतर्गत आझम अन्सारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे," असे रेल्वे अधिकारी म्हणाले.

सलमान खानचा डुप्लिकेट आझम अन्सारी
सलमान खानचा डुप्लिकेट आझम अन्सारी

आझमवर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही घंटाघर येथे जमाव जमवून रील बनवून शांतता भंग केल्याप्रकरणी ठाकूरगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आझम लखनौ शहरातील वेगवेगळ्या खुणा आणि रस्त्यांवरील रील्स पोस्ट करत असतो. ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

आझम अन्सारीने रेल्वे ट्रॅकवर रील बनवताना

हेही वाचा - भीषण अपघातानंतर कमल हासनच्या इंडियन २ चे शुटिंग पुन्हा सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.