मुंबई - Tejas Vs 12th Fail Box Office Clash: हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता विक्रांत मॅसी आणि पलक लालवानी स्टारर 'ट्वेल्थ फेल' या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाची निर्मिती 25 कोटींमध्ये झाली आहे. हा चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. 'ट्वेल्थ फेल'चं दिग्दर्शन विधू विनोद चोप्रा यांनी केले आहे. या चित्रपटाला आएमडीबी (IMDb)वर 10 पैकी 9 रेटिंग मिळाली आहेत. या चित्रपटाची कहाणी आयएएसची (IAS) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याच्या संघर्षावर आधारित आहे.
- चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच विक्रांतच्या 'ट्वेल्थ फेल'च्या ट्रेलरला सोशल मीडियावर खूप पसंती मिळाली होती. 'ट्वेल्थ फेल' चित्रपट बॉक्स ऑफिसवर कंगना राणौतच्या 'तेजस' प्रदर्शित झाला आहे. 'तेजस' चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमी कमाई करत आहे. हा चित्रपट जवळपास 45 कोटीच्या बजेटमध्ये तयार झाला आहे, मात्र सध्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही.
बॉक्स ऑफिस कलेक्शन : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'तेजस'नं पहिल्या दिवशी 1.25 कोटींचा व्यवसाय केला. त्यानंतर या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 1.31 कोटीची कमाई केली. हा चित्रपट तिसऱ्या दिवशी 1.50 कोटी कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 4.06 होईल. दुसरीकडे विक्रांत मॅसीचा 'ट्वेल्थ फेल' या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यानंतर या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 2.51 कोटीचा व्यवसाय केला. हा चित्रपट आता रिलीजच्या तिसऱ्या दिवसात आहे. तिसऱ्या दिवशी 'ट्वेल्थ फेल' 3.50 कोटी कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 7.12 होईल. विक्रतच्या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कंगनाच्या चित्रपटाला मात दिली आहे.
'ट्वेल्थ फेल' विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार : विक्रांत मॅसीचा चित्रपट हा दिल्ली एनसीआर आणि मुंबईमध्ये सर्वाधिक व्यवसाय करत आहे. 'ट्वेल्थ फेल'मध्ये विक्रांतनं उत्कृष्ट अभिनय केला आहे. हा चित्रपट स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप प्रेरणादायी ठरणार आहे. 'ट्वेल्थ फेल' हा चित्रपट 600 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. कंगनाचा चित्रपट कसा कामगिरी बॉक्स ऑफिसवर करेल हे पाहणं खूप रंजक असणार आहे. 2019 पासून कंगनाचे सहा चित्रपट फ्लॉप झाले आहेत. फ्लॉप झालेल्या चित्रपटामध्ये 'मणिकर्णिका' - 91.19 कोटी, 'जजमेंटल' - 33.11 कोटी, पंगा - 28.9 कोटी, थलैवी - 4.75 कोटी , धाकड - 2.58 कोटी, 'चंद्रमुखी 2 - 51.7 या सिनेमांचा समावेश आहेत.
हेही वाचा :
- Matthew Perry death : 'फ्रेंडस' फेम अभिनेता मॅथ्यू पेरीच्या मृत्यूनंतर अमेरिकेतील सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त...
- kangana Ranaut Tejas : 'तेजस' पाहण्यासाठी कंगनानं चाहत्यांना थिएटरमध्ये जाण्याचे प्रेक्षकांना केलं आवाहन...
- Matthew Perry Death : फ्रेंड्स मालिकेतील अभिनेता मॅथ्यू पेरीचा टबमध्ये आढळला मृतदेह, लॉस एंजेलिस पोलिसांकडून तपास सुरू