ETV Bharat / entertainment

Tejas teaser out: कंगना राणौत स्टारर 'तेजस' चित्रपटचा टीझर झाला प्रदर्शित; पहा टीझर... - तेजस

कंगना राणौतचा आगामी 'तेजस' चित्रपटचा टीझर प्रदर्शित झाला आहे. सर्वेश मेवारा दिग्दर्शित हा चित्रपट 20ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

Tejas teaser out
तेजसचा टिझर रिलीज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 2, 2023, 1:21 PM IST

मुंबई - Tejas Teaser Out: कंगना राणौत ही बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. कंगनाचा नुकताच हॉरर कॉमेडी ड्रामा चित्रपट 'चंद्रमुखी 2' हा रूपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील कंगनाच्या अभिनयाचं खूप कौतुक सध्या होत आहे. 'तेजस' चित्रपटात कंगना राणौत पहिल्यांदाच एअरफोर्समधील पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त निर्मात्यांनी कंगनाच्या 'तेजस'ची पहिली झलक दाखवली आहे. या चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज झाल्यानंतर अनेकजणांना ट्रेलरची वाट पाहत आहे.

'तेजस'चा टिझर झाला प्रदर्शित : 'तेजस' हा चित्रपट सर्वेश मेवारा लिखित आणि दिग्दर्शित आहे. या चित्रपटामध्ये कंगना रणौत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'तेजस'चा ट्रेलर हा 8 ऑक्टोबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय हा चित्रपट 20 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामध्ये कंगना व्यतिरिक्त अंशुल चौहान, वरुण मित्रा, मिर्को क्वानी, वीणा नायर आणि अनुज खुराना हे कलाकार आहेत. कंगना राणौत स्टारर 'तेजस' ची कहाणी ही हवाई दलातील पायलट तेजस गिलच्या प्रवासाभोवती फिरणारी आहे. 'तेजस' चित्रपटात कंगनानं तेजस गिलची भूमिका साकारली आहे.

'तेजस'चा टीझर खूपच दमदार : आरएसव्हीपी (RSVP) द्वारे निर्मित 'तेजस' चित्रपटाचा टीझर हा खूप प्रभावी आहे. तेजस गिलच्या भूमिकेत कंगना खूपच छान दिसत आहे. टीझरच्या सुरुवातीला कंगना रणौत एअरफोर्स पायलटच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. त्यानंतर, पार्श्वभूमीत एक आवाज ऐकू येतो आणि यामध्ये सांगितल्या जाते की, 'महत्वाचे नाही की प्रत्येक युद्ध जिंकलं पाहिजे. आता रणांगणात युद्ध झालं पाहिजे. माझ्या देशावर मोठा प्रहार झाला आहे. आता आकाशातून पाण्याचा वर्षाव नाही तर आगीचा वर्षाव झाला पाहिजे. टीझरमध्ये कंगनाचा अ‍ॅक्शन अवतार खूप जबरदस्त आहे.

  • वर्कफ्रंट : कंगना रनौत वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती 'तेजस'नंतर 'इमर्जन्सी'मध्ये दिसणार आहे. या मोस्ट अवेटेड चित्रपटामध्ये कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तिनं केलं आहे. 'इमर्जन्सी'मध्ये कंगना राणौतशिवाय श्रेयस तळपदे, अनुपम खेर आणि इतर अनेक कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचा :

  1. Kannada Actor Nagabhushana Arrested : साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नागभूषणला झाली अटक...
  2. Sky Force Teaser Release: अक्षय कुमारनं आगामी चित्रपट 'स्काय फोर्स'चा टीझर केला प्रदर्शित; पहा टिझर...
  3. Pakistan Actress Mahira Khan Wedding : 'रईस' फेम पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान पुन्हा लग्नाच्या बेडीत, व्हायरल झाले फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.