ETV Bharat / entertainment

Tejas Box Office Collection Day 2: कंगना रणौत स्टारर 'तेजस' चित्रपटाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2023, 11:50 AM IST

Tejas Box Office Collection Day 2: कंगना रणौतच्या 'तेजस' या चित्रपटानं चाहत्यांची निराशा केली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटानं फारशी कमाई केली नाही. दुसऱ्या दिवशीही हा चित्रपट कमी कमाई करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Tejas Box Office Collection Day 2
तेजस बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 2

Tejas Box Office Collection Day 2 : हिंदी चित्रपटसृष्टीतील कंगना रणौतचा चित्रपट 'तेजस' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाकडून कंगनाला खूप अपेक्षा होत्या, मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमी कमाई करत आहे. कंगनानं 'तेजस'मध्ये एअरफोर्स ऑफिसरची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची रिलीजपूर्वी बरीच चर्चा होती. याशिवाय या चित्रपटाचे कंगनाही जोरदार प्रमोशन केलं होतं. 'तेजस'चं इतकं प्रमोशन करूनही, हा चित्रपट बॉक्सवर जादू चालवू शकण्यामध्ये असमर्थ ठरला आहे. 'तेजस' समीक्षकांसोबतच प्रेक्षकांना देखील आवडला नाही, त्यामुळे चित्रपटगृहात खूपच कमी गर्दी आहे. या चित्रपटानं पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कलेक्शन केले आहे हे जाणून घेऊया...

'तेजस'ची कमाई : 'तेजस' चित्रपटात कंगना राणौतसोबत अंशुल चौहान, वरुण मित्रा, आशिष विद्यार्थी आणि विशाख नायर हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी रुपेरी पडद्यावर 1.25 कोटीची कमाई केली आहे. आता हा चित्रपट रिलीजच्या दुसऱ्या दिवसात आहे. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 'तेजस' 1.50 कोटीची कमाई करू शकते. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन हे 2.75 होईल.' तेजस' चित्रपट वीकेंडला चांगला कलेक्शन करेल अशी अपेक्षा केली जात आहे. कंगना रणौतचा 'तेजस' भारतात 1300 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. याशिवाय या चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकिंगही खूपच कमी झाली आहे.

कंगना राणौतचे फ्लॉप चित्रपट : गेल्या 5 वर्षात कंगना रणौतनं 6 फ्लॉप चित्रपट दिले आहेत, ज्यामध्ये आता 'तेजस'च्या नावाचा देखील समावेश होणार आहे. 2019 पासून कंगनाचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले आहेत. यामध्ये 'मणिकर्णिका' - 91.19 कोटी, 'जजमेंटल' - 33.11 कोटी, पंगा - 28.9 कोटी, थलैवी - 4.75 कोटी , धाकड - 2.58 कोटी असे फ्लॉप चित्रपट आहेत. याशिवाय तिचा साऊथ चित्रपट 'चंद्रमुखी 2 'देखील बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आहे. या चित्रपटानं 51.7 कोटीची कमाई केली. सलग 6 फ्लॉपनंतर कंगना राणौतचा चित्रपट 'तेजस'ही फ्लॉपच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसून येत आहे. सध्या कंगनाचं बॉलिवूड करिअरही मोठ्या संकटात सापडलं आहे.

हेही वाचा :

  1. Saif Ali Khan : सैफ अली खानच्या घरी पोहोचले मुंबई पोलीस, काय आहे कारण?
  2. Weekend Ka Vaar: सलमाननं विकी जैनचा पर्दाफाश केल्यानं अंकिताच्या डोळ्यात पाणी, मन्नारामुळे अभिषेकनं खाल्ले टोमणे
  3. Saif Ali Khan : सैफ अली खानच्या घरी पोहोचले मुंबई पोलीस, काय आहे कारण?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.