मुंबई - 'रूप नगर के चीते' या वेगळ्या विषयावरील चित्रपटाचा पहिला टिझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. दोन मित्रांच्या सत्यकथेवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. करण किशोर परब आणि कुणाल शुक्ला हे नवोदित कलाकार यात झळकणार आहेत. बॉलिवूडमधील निर्माता विपुल अमृतलाल शाह यांचे पुतणे मनन शाह यांनी एस एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली 'रूप नगर के चीते' या मराठी सिनेमाची निर्मिती केली आहे. विहान सूर्यवंशी हे 'रूप नगर के चीते'चं दिग्दर्शन करीत आहेत. १६ सप्टेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.
-
'ROOP NAGAR KE CHEETEY' FIRST TEASER UNVEILS... Inspired by true events, a fascinating journey of aspirations and friendship of a lifetime... Here's the first teaser of #Marathi film #RoopNagarKeCheetey... Stars newcomers #KaranKishoreParab and #KunalShukla. pic.twitter.com/YvYODJuJYW
— taran adarsh (@taran_adarsh) July 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">'ROOP NAGAR KE CHEETEY' FIRST TEASER UNVEILS... Inspired by true events, a fascinating journey of aspirations and friendship of a lifetime... Here's the first teaser of #Marathi film #RoopNagarKeCheetey... Stars newcomers #KaranKishoreParab and #KunalShukla. pic.twitter.com/YvYODJuJYW
— taran adarsh (@taran_adarsh) July 22, 2022'ROOP NAGAR KE CHEETEY' FIRST TEASER UNVEILS... Inspired by true events, a fascinating journey of aspirations and friendship of a lifetime... Here's the first teaser of #Marathi film #RoopNagarKeCheetey... Stars newcomers #KaranKishoreParab and #KunalShukla. pic.twitter.com/YvYODJuJYW
— taran adarsh (@taran_adarsh) July 22, 2022
या मराठी सिनेमाचं शीर्षक असं हिंदी का? असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडेल, पण त्यामागील कारणही तसंच आहे. 'रूप नगर के चीते' हे सिनेमाचं शीर्षक 90 च्या दशकात प्रदर्शित झालेल्या एका हिंदी सिनेमात असलेल्या 'हम रूप नगर के चीते है, शिकार पर ही जीते है' या गाजलेल्या संवादावरून प्रेरीत आहे. हा सिनेमा मुख्य भूमिकेत असलेले दोन चीते म्हणजेच जीवलग मित्रांवर बेतलेला असल्यामुळेच हे शीर्षक 'रूप नगर के चीते' ठेवण्यामागील दुसरं कारण आहे.
'रूप नगर के चीते' या सिनेमात दोन बालमित्रांचा रोमहर्षक प्रवास आणि एक घटना घडल्यानंतर त्यांचं दोन भिन्न शहरांतील विरोधाभासी जीवन दाखवण्यात येणार आहे. पहिला टिझर आकर्षक झाला असून चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणारा आहे.
या चित्रपटात करण किशोर परब, कुणाल शुक्ला या नवोदित कलाकारांसह हेमल इंगळे, सायुशी टिळक, मुग्धा चाफेकर, सना प्रभू, अक्षय केळकर, सौरभ रजनीश चौघुले, ओंकार भोजने, अजित पवार, रजत कपूर, अनिता परळीकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. १६ सप्टेंबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
हेही वाचा - शमशेरा ट्विटर रिव्ह्यू : नेटिझन्सनी केले रणबीरचे कौतुक, मात्र समीक्षकांची परखड टीका