मुंबई - आदित्य रॉय कपूर आणि मृणाल ठाकुर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या आगामी क्राईम थ्रिलर चित्रपट 'गुमराह' च्या निर्मात्यांनी मंगळवारी टीझर रिलीजची तारीख जाहीर केली आहे. इन्स्टाग्रामवर आदित्य रॉय कपूरने चाहत्यांशी एक नवीन घोषणा करत संवाद साधला. पोस्टर शेअर करताना त्याने लिहिले, 'सहजपणे विश्वास ठेवू नका! गुमराह चित्रपटाचा टीझर उद्या प्रदर्शित होईल! 7 एप्रिल 2023 पासून हा चित्रपट सिनेमागृहात रिलीज होणार आहे.'
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
'मलंग' चित्रपटामुळे लोकप्रिय ठरलेला अभिनेता आदित्य रॉय कपूरने त्याच्या कारकिर्दीत प्रथमच दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे, तर मृणाल या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. नवोदित दिग्दर्शक, वर्धन केतकर दिग्दर्शित, 'गुमराह' हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ हिट अॅक्शन-थ्रिलर चित्रपट 'थडम' चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. मागिझ थिरुमेनी दिग्दर्शित, या चित्रपटात अरुण विजय आणि तान्या होप मुख्य भूमिकेत होते.
आदित्य आणि मृणाल या चित्रपटात पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत. याशिवाय, आदित्य 'द नाईट मॅनेजर' नावाचा एक नवीन वेब शो घेऊन आला आहे, ज्यामध्ये अनिल कपूर आणि शोभिता धुलिपाला मुख्य भूमिकेत आहेत. ही मालिका जॉन ले कॅरे यांच्या 'द नाईट मॅनेजर' या कादंबरीचे अधिकृत हिंदी रूपांतर आहे, द इंक फॅक्टरी आणि बनजय एशिया निर्मित.
या प्रकल्पाविषयी बोलताना आदित्यने याआधी सांगितले आहे की, 'जेव्हा सूड आणि विश्वासघात असतो, तेव्हा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणे अपरिहार्य असते. नाईट मॅनेजर ही मालिका आकर्षक गुंतागुंतीच्या पात्रांच्या मागे खेचून आणते. जसे ते म्हणतात, अजूनही पाणी खोलवर वाहते आणि मी साकारत असलेले पात्र शान या वाक्याला खूप मूर्त स्वरूप देते. शान या पात्राच्या मनात काय आहे हे कधीच सांगता येत नाही पण तुम्हाला माहीत आहे की, रथाची च्करे एका अनपेक्षित वळणावरून दुसऱ्या वळणावर वळवळत आहेत. काही उत्कृष्ट प्रतिभेसोबत काम करणे हा एक दीर्घकालचा चांगला अनुभव आहे. भारतीय चित्रपट उद्योग, डिस्ने+ हॉटस्टारच्या डायनॅमिक टीमने आम्हाला एकत्र केले आहे.'
वर्कफ्रंटवर, आदित्य रॉय कपूर आगामी अनुराग बसूच्या दिग्दर्शित मेट्रो इन दिनोमध्ये झळकणार आहे. या चित्रपटात सारा अली खानही मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट नात्यांच्या कडू-गोड कथांभोवती विणलेली प्रेम कथा असणार आहे. आदित्य रॉय कपूर आणि सारा यांच्या शिवाय मेट्रो...दिनोमध्ये अनुपम खेर, नीना गुप्ता, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा, फातिमा सना शेख आणि अली फजल अशी दिग्गज कलाकारांच्याही प्रमुख भूमिका आहेत. टी सिरीजद्वारे निर्मिती केलेला हा चित्रपट 8 डिसेंबर 2023 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होईल.
हेही वाचा - Sonu Sood Meets Amarjeet Jaikar : सोनू सूदने घेतली बिहारचा व्हायरल बॉय अमरजित जयकरची भेट