मुंबई - 'हर हर महादेव' या चित्रपटाचा टीझर लॉन्च झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा ऐतिहासिक चित्रपट मराठीसह हिंदी, तामिळ, तेलुगु आणि कन्नड या भाषेत रिलीज होणार आहे. हा पहिलाच पॅन इंडिया मराठी चित्रपट असेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत शिरीष देशपांडे यांनी केले आहे.
-
'HAR HAR MAHADEV': MARATHI FILM TO RELEASE IN 5 INDIAN LANGUAGES... #ZeeStudios unveils the teaser of #Marathi film #HarHarMahadev, which will release in five #Indian languages this #Diwali: #Marathi, #Hindi, #Tamil, #Telugu and #Kannada... Directed by #AbhijeetShirishDeshpande. pic.twitter.com/20qJH4FH7y
— taran adarsh (@taran_adarsh) June 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">'HAR HAR MAHADEV': MARATHI FILM TO RELEASE IN 5 INDIAN LANGUAGES... #ZeeStudios unveils the teaser of #Marathi film #HarHarMahadev, which will release in five #Indian languages this #Diwali: #Marathi, #Hindi, #Tamil, #Telugu and #Kannada... Directed by #AbhijeetShirishDeshpande. pic.twitter.com/20qJH4FH7y
— taran adarsh (@taran_adarsh) June 6, 2022'HAR HAR MAHADEV': MARATHI FILM TO RELEASE IN 5 INDIAN LANGUAGES... #ZeeStudios unveils the teaser of #Marathi film #HarHarMahadev, which will release in five #Indian languages this #Diwali: #Marathi, #Hindi, #Tamil, #Telugu and #Kannada... Directed by #AbhijeetShirishDeshpande. pic.twitter.com/20qJH4FH7y
— taran adarsh (@taran_adarsh) June 6, 2022
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटरवर एक पोस्ट लिहून ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलं., ''हर हर महादेव हा मराठी चित्रपट ५ भारतीय भाषामध्ये रिलीज होणार आहे. झी स्टुडिओची निर्मिती असलेला हा चित्रपट मराठीसह हिंदी, तामिळ, तेलुगु आणि कन्नड या भाषेत रिलीज होणार आहे. ''
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या ऐतिहासिक चित्रपटात कोण कलाकार असतील, कथानक काय असेल व इतर तपशील अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. यंदाच्या दिवाळीमध्ये 'हर हर महादेव' चित्रपट थिएटर्समध्ये दाखल होईल.
हेही वाचा - Dharmendra : माझ्या वडिलांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवू नका बॉबी देओल