हैदराबाद - अभिनेत्री रश्मिका मंदान्नाच्या वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी, VNRTrio च्या टीमने चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये रश्मिका एका आकर्षक लूकमध्ये दिसत आहे. वेंकी कुदुमुला दिग्दर्शन करत असलेल्या VNRTrio या आगामी चित्रपटात पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका आणि तेलुगु स्टार नितीन एकत्र झळकणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
VNRTrio चे आकर्षक पोस्टर - रश्मिकाच्या वाढदिवशी, निर्मात्यांनी इन्स्टाग्रामवर एका अल्ट्रा-मोडिश लूकमध्ये अभिनेत्रीचे कॅप्शन असलेले पोस्टर रिलीज केले: 'VNRTrio च्या टीमच्या वतीने रश्मिका मंदान्नाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. तू नेहमी हसत राहा आणि आनंद पसरवत राहा, असे शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.'
रश्मिकावर वाढदिवस शुभेच्छांचा वर्षाव - निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर टाकताच, चाहत्यांनी अभिनेत्री रश्मिकाला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कमेंट सेक्शन भरुन सोडले. चाहत्यांनी तर तिच्या पोस्टरवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. कमेंट विभागात एका सोशल मीडिया युजरने लिहिले: वाढदिवसाच्या शुभेच्छा क्युटी. दुसर्या चाहत्याने लिहिले: रश्मिका मंदाना मी बीजी फॅन आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. या पोस्टला भारतभरातील चाहत्यांकडून खूप प्रेम आणि प्रशंसा मिळाली.
रश्मिकाचा आगामी साहसी चित्रपट VNRTrio - पोस्टरच्या पार्श्वभूमीत एक परदेशी लोकेशन दर्शवते की ती चित्रपटातील एक एनआरआय मुलगी आहे. रश्मिका मंदान्ना नीतीनसोबतच्या तिच्या दुसऱ्या चित्रपटात तिच्या वास्तविक जीवनातील पात्रासारखीच वास्तव भूमिका साकारत असल्याचे म्हटले जाते. मैत्री मुव्हीज मेकर्सने या प्रकल्पासाठी फायनान्स केला असून हा एक साहसी मनोरंजक चित्रपट असणार आहे. जीव्ही प्रकाश कुमार यांनी संगीत दिले आहे आणि चित्रपटाचे चित्रीकरण साई श्रीराम करणार आहेत. उगादीनंतर म्हणजेच गुढी पाडव्यानंतर काही दिवसांनी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून लवकरच चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.
रश्मिका मंदान्ना आणि आलिया भट्टचा व्हायरल व्हिडिओ - याआधी, रश्मिका मंदान्ना आणि आलिया भट्टचा आरआरआर चित्रपटातील ऑस्कर विजेत्या गाण्यातील नाटू नाटूचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका व्हिडिओमध्ये आलिया पांढरा आणि रश्मिका मेटॅलिक हस्तिदंतीच्या साडीत दिसली. नाचो नाचो या गाण्याच्या हिंदी आवृत्तीवर नाचत दोघे स्टेजवर परफॉर्म करत होते. आलियाने प्रसिद्ध हुक स्टेप करण्यापूर्वी रश्मिकाभोवती फिरताना दिसते. मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या लॉन्चिंग सोहळ्यात अभिनेत्रींनी गाण्यावर डान्स केला.
हेही वाचा - Pushpa 2 Teaser: जखमी पुष्पा जेलमधून फरार, मोठ्या पडद्यावर पुन्हा थरार